???? SK NEWS मराठी – झटपट बातम्या | 22 फेब्रुवारी 2022

???? SK NEWS मराठी –

झटपट बातम्या | २२ फेब्रुवारी २०२२

???? सांगलीत “पुष्पा” ने केले चंदनाचे झाड लंपास*????????

सांगली: त्रिकोणी बागेतील चंदनाच्या झाडाची चोरी झाल्याचा प्रकार सोमवारी सकाळी उघडकीस आला. सकाळी बागेत व्यायामासाठी येणार्‍या लोकांनी महापालिकेकडे तक्रार केली त्यानंतर पंचनामा करण्यात आला. मनपाचे उद्यान अधीकक्ष गिरीष पाटक मंगळवारी पोलिस ठाण्यात तक्रार करणार आहेत. बागीला चारी बाजूंनी कुंपण आहे. बागेमध्ये दररोज हजारो नागरिक सकाळ-

संध्याकाळी फिरण्यास येत असतात. दरम्यान, बागेच्या राखण्यासाठी एका वॉचमेनचीही नियुक्ती करण्यात आली आहे. तो बागेमध्ये एका खोलीत कुटुंबासह राहतो. बागेमध्ये गेल्या २० वर्षापासून चंदनाचे झाड होते. रविवारी मध्यरात्री चोरट्यांनी हे झाड लंपास केले. सोमवारी सकाळी नागरिकांच्या हा प्रकार लक्षात आला. माहिती मिळताच महापालिकेचा उद्यान विभाग खडबडून जागा झाला. उद्यान अधीक्षक गिरीश पाटक यांच्यासह कर्मचाऱ्यांनी बागेमध्ये धाव घेत पाहणी केली व पंचनामा केला.

???? *पुणेकरांसाठी मोठी बातमी; ‘या’ कारणामुळे शहरातील पाणीपुरवठा राहणार बंद*
????????पुणेकरांना पुढील काही दिवस पाण्याचा जपून वापर करावा लागणार आहे. कारण शहरात येत्या गुरुवारी (२४ फेब्रुवारी) देखभाल दुरुस्ती आणि स्थापत्य विषयक कामांमुळे काही भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. सोमवार पेठ, मंगळवार पेठ, रास्ता पेठ, कोरेगाव पार्कसह, हडपसर, मुंढवा या परिसरातील पाणीपुरवठा खंडित होणार आहे.

*???? राज कुंद्रा पोनोंग्राफि प्रकरणातील चार फरार आरोपींना अटक*
???????? मुंबई, 22 फेब्रुवारी-राज कुंद्रा पॉनोंग्राफी प्रकरणात मुंबई क्राईम ब्रेॅचच्या प्रॉपर्टी सेलने मोठी कारवाई करून आणखी ४ फरार आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये कास्टिंग डायरेक्टर आणि त्यांच्या तीन साथीदारांचा समावेश असून, त्यांना मुंबईतल्या वसोंवा आणि बोरिवली परिसरातून अटक करण्यात आली आहे.

???? *पॉझिटिव्ह! करोना रुग्णसंख्येत मोठी घट, ‘अशी’ आहे सद्यस्थिती*
????????मुंबई आणि महाराष्ट्रातील रुग्णसंख्येत गेल्या काही दिवसांपासून घट होत असून, तिसरी लाट जवळपास संपुष्टात आल्याचे चित्र आहे. राज्यातील दैनंदिन रुग्णसंख्येत मोठी घट झाली असून, दैनंदिन रुग्णसंख्या हजाराच्या खाली आली आहे.

????‍???? *गरीब बापाची श्रीमंत लेक*
???????? संबंधित घटना मध प्रदेशातील रायसेन जिल्ह्यातील उदयपुरा येतील आहे. रीना मंगल सिंह असं या मुलीचं नाव असून ती इयत्ता दहावीच्या वर्गात शिकते. रस्त्याने चालत जाताना वाटेत सात लाख रुपयाचे दागिने असलेली बॅग सापडली, तर भल्याभल्यांचा प्रामाणिकपणा गळून पडण्याची शक्यता असते. पण कामगाराच्या एका मुलीनं मात्र असं केले नाही. तिने प्रामाणिकपणे सापडलेले सर्व दागिने पोलीस ठाण्यात नेऊन जमा केले आहेत. हे दागिने खऱ्या मालकाला मिळाल्यानंतर त्याने खुश होऊन संबंधित मुलीला ५१ हजार रुपयांच बक्षीस दिलं आहे. बापाची गरिबी असणाऱ्या मुलीच्या मनाची श्रीमंती पाहून अनेकांनी तिचे कौतुक केले आहे. पोलिसांनी देखील तिचा सत्कार केला आहे. रीना मंगल सिंह असे या मुलीचे नाव असून ती इयत्ता दहावीच्या वर्गात शिकते.

*???? तासगाव बहुउद्देशीय हॉल व छत्रपती शिवाजी महाराज संकुल येथे लसीकरण सुरू*
???????? तासगाव: शासनाच्या निर्देशानुसार व लसीच्या उपलब्धतेनुसार आज पहिला, दुसरा व बूस्टर डोस ३२ नागरिकांना दिला. याबाबत डॉक्टर सचिन जाधव यांनी दिली माहिती.

*???? उत्तराखंडामधील चंपावत जिल्ह्यात एक भीषण रस्ता आपघात* . खटीमा( उत्तराखंड)मिरवणुकीने भरलेली मॅक्स कार खोल दरीत कोसळली, मॅक्स मधील १४ जणांचा मृत्यू झाला आहे. गाडी टनकपुरहुन मीरवकणुकीकडे परतत होती. सुखीधांग रात्री उशिरा हा अपघात झाला.

*????????‍♀️ पाकिस्तान सुपर लीग मध्ये लज्जास्पद कृत्य, खेळाडूंनी सर्व मर्यादा ओलांडल्या*
???????? पाकिस्तान सुपर लीग आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. ले ऑफ गाठण्यासाठी प्रत्येक संग जोमाने खेळतोय. पण या लिंगमध्ये क्रिकेट जगताची मान शरमेनं खाली जाईल असे कृत्य खेळाडूकडून घडलंय. खेळाडूंनी सर्व मर्यादा ओलांडल्या पहिला मिळतंय. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सुपर लीगमधल्या एका सामन्यादरम्यान पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज सोहेल तनवीर आणि ऑस्ट्रेलियाचा खेळाडू वेन कटिंग यांच्या तू तू मैं मैं झालं. क्रिकेटच्या मैदानात खेळाडू एकमेकांना टोमणे मारना किंवा एकमेकांच्या अंगावर धावून जाणं हे असं पाहायला मिळतं. पण या दोन्ही खेळाडूंनी सर्व मर्यादा पार करत एकमेकांना अश्लिल हावभाव केले. पाकिस्तान सुपर लीग मध्ये पेशावर जाल्मी आणि कॅटा सामन्यादरम्यान सोहेल तनवीर आणि वेल कटिंग यांनी एकमेकांना पाहून मिडल फिंगर दाखवलं. याचा व्हिडिओ चर्चेत आहे.

*????????‍♀️ स्टेडियममध्ये लज्जास्पद कृत्य*
???????? PSL२०२२: हॅरीस रैफने कॅप्टन शाहीन शाह आफ्रिदीसमोर कामरानला मारली कानाखाली-व्हिडिओ व्हायरल

  1. (संकलन – राजू यादव)

Published by SK NEWS MARATHI