???? Sk NEWS मराठी – झटपट बातम्या:
| २३ फेब्रुवारी २०२२
*???? दुकानावर मराठीच पाट्या,याचिकाकर्त्यांना २५ हजाराचा दंड, पैसे मुख्यमंत्री मदतनिधीत जमा करण्याचे आदेश, दुकानदारांपेक्षा ग्राहक महत्त्वाचे, त्यामुळे पाट्य़ा स्थानिक भाषेतच हव्या- उच्च न्यायालय
???????? मराठी फटयाविषयी राज्यसरकारने घेतलेल्या निर्णयाला थेट मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देणाऱ्या व्यापारी संघटनेला न्यायालयाने फटकारलं आहे. यासंदर्भात व्यापारी संघटनेने दाखल केलेली याचिका फेटाळून लावताना न्यायालयाने त्यांच्या विरोधात राज्य सरकारच्या बाजूने निर्णय दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व दुकानावर मराठी फाट्या लावण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला न्यायालयाने देखील योग्य ठरवलंआहे. राज्य सरकारने जानेवारी महिन्यामध्ये जारी केलेल्या शासन आदेशानुसार राज्यातील सर्व दुकानावर इतर भाषा सोबतच मराठी भाषेत देखील फाट्या लावण्याचे निर्देश दिले होते. राज्य सरकारने 12 जानेवारी रोजी मंत्रिमंडळात मराठी पाट्याविषयी निर्णय घेतला होता. यानुसार, महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवा सक्तीचे विनियमन) अधिनियम, २०१७ मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे राज्यातील सर्व छोट्या-मोठ्या दुकानावरील फाट्या मराठी भाषेतून ठेवाव्या लागणार आहेत.
*????♂️ ८ तासांच्या चौकशीनंतर मंत्री नवाब मलिक यांना ईडी कडू अटक, लढेंगे और जितेंगे अटकेनंतर नवाब मलिक यांची पहिली प्रतिक्रिया*
???????? मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिकयांनाअंमलबजावणी संचालनालयाकडून(ईडी) आज (ता.२३) अटक करण्यात आली. जुन्या मालमत्तेच्या व्यवहारात प्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचे समजते. इक्बाल कासकर याने चौकशीत नाव घेतल्यानंतर मलिक यांच्या घरी आज सकाळीच ईडीचे पथक धडकले होते. त्यानंतर मलिक यांना चौकशीसाठी ईडी कार्यालयात नेण्यात आले. सकाळपासून त्यांची चौकशी सुरू होती. त्यांना अटक करण्यात आली. गुन्हेगारांकडून जमीन खरेदीचा ठपका मलिक यांना आता मेडिकलसाठी जे जे रुग्णालयात नेण्यात आला आहे. मेडिकल तपासणी झाल्यावर त्यांना सेशन्स कोर्टासमोर हजर करण्यात आलं.
*???? टेम्पोला लागलेल्या आगीत पुणे बोर्डाच्या दहावी बारावीच्या प्रश्नपत्रिका जळून खाक*
???????? पुणे-नाशिक महामार्गावर संगमेश्वर तालुक्यात चंदनापुरी घाटात आज दुपारी बुधवारी पहाटे धावत्या टेम्पोला अचानक आग लागली. या टेम्पोमधून मध्य प्रदेशातील भोपाळ येथून पुणे बोर्डाच्या प्रश्नपत्रिका नेण्यात येत होत्या. दुर्घटनेत प्रश्नपत्रिका जळून खाक झाल्या असून या प्रश्नपत्रिका दहावी व बारावीच्या असाव्यात असा पोलिसांचा अंदाज आहे. पुणे बोर्डाला याची माहिती कळविण्यात आली असून त्याच्यां उपस्थितीत पंचनामा केला जाणार आहे. त्यानंतर या नेमक्या कोणत्या प्रश्नपत्रिका होत्या. हे स्पष्ट होईल, असं पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी सांगितले आहे.
????????♀️ *विद्यार्थ्यांना येत्या या तारखा पासून मिळणार शिजवलेली पौष्टिक खिचडी*
????????कोविड १९ नियमांचे पालन करून शिजवलेली पौष्टिक खिचडी विद्यार्थ्यांना येत्या १५ मार्चपासून मिळणार आहे. राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र, मध्यान्ह भोजन योजनेंतर्गत (शालेय पोषण आहार) शाळांमधून शिजवून दिला जाणारा ताजा आहार (खिचडी) बंद होती. ती आता विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे.
???? *राज्यात काल मृत्युसंख्येने चिंता वाढवली; पाहा, ताजी स्थिती!*
???????? राज्यात काल १ हजार ०८० नव्या रुग्णांचे नोंद झाले असून २ हजार ४८८ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर राज्यात एकूण सक्रिय रुग्णांची संख्या १३ हजार ०७० वर पोहोचली आहे.तर एकूण ४७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
*???? तासगाव दत्त माळावरील ग्रामीण रुग्णालय मधील लसीकरण मोहीम सुरू*
???????? तासगाव ग्रामीण रुग्णालय येथे पहिला डोस १ व दुसरा डोस ३ व बूस्टर १ असे एकूण ५ नागरिकांना डोस दिले. अशी हा माहिती डॉक्टर शिवाजी गोसावी यांनी दिली.
*???? तासगाव बहुउद्देशीय हॉल व छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल येथे लसीकरण सुरू*
???????? तासगाव: शासनाच्या निर्देशानुसार व लसीच्या उपलब्धतेनुसार आज पहिला, दुसरा व बूस्टर डोस ४१ नागरिकांना दिला. अशी माहिती डॉक्टर सचिन जाधव यांनी दिली.
*???? सौ. संध्या सचिन कुमार पाटील यांनी आपल्या सरपंच पदाचा दिला राजीनामा*
???????? ता. तासगाव: वज्रचौंडे गावच्या सरपंच सौ. संध्या सचिन कुमार पाटील यांनी आपल्या पदाचा दिला राजीनामा. एक वर्षाची मुदत संपल्यामुळे ठरलेल्या मुदतीत दिला राजीनामा. सरपंच सौ. संध्या पाटील यांनी एक वर्षाच्या कार्य कीर्तीत कोट्यावधी विकास कामाचा तिला लेखाजोखा…
????????♀️ *अमृता फडणवीसांनी त्यांच्या नव्या गाण्याचे पोस्टर केले लॉंच, या तारखेला येणार गाणे प्रेक्षकांच्या भेटीला*
????????आगामी ‘शिव तांडव स्त्रोतम’ या गाण्याचे पोस्टर रिलीज केले आहे. हे गाणे २४ फेब्रुवारी २०२२ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
*???? क्रिकेटर ने वाचवला जीव*
???????? उपकर्णधार के एल राहुल भारताचा भरवशाचा फलंदाज आहे. त्याच्या शानदार फलंदाजीचे लाखो चाहते आहेत. मैदानांवर आपल्या खेळाने राहुल सर्वांचे मन जिंकून घेतो. पण आता मैदानाबाहेरही राहुल ने केलेल्या एका कृतीचं सर्व जण कौतुक करत आहेत. केएल राहुल ने दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या एका ११ वर्षाच्या लहान मुलाची मदत केली आहे. के एल राहुल ने लहान मुलाचे प्राण वाचवण्यासाठी ३१ लाख रुपयाची मदत केली आहे.भारतीय क्रिकेटपटू विविध कारणामुळे चर्चेत असतात. करोणा काळात दिलेले योगदान असो व इतर संस्थाने दिलेली देणगी असो, क्रिकेटपटू नेहमी आपल्याकडील संपत्तीचा उपयोग अनेकाच्या मदतीसाठी करत असल्याचे आपण पाहिले आहे. आता असेच एक उदाहरण केएल राहुलच्या रूपात समोर आला आहे.
Published by SK NEWS MARATHI….