येळावी गावातील शेतीपंपाची मोटर गेली चोरीस | तासगांव पोलीस ठाणेत फिर्याद दाखल | Tasgaon | Sangli 

येळावी गावातील शेतीपंपाची मोटर गेली चोरीस | तासगांव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल

● येळावी गावातील शेतीपंपाची मोटर गेली चोरीस तासगांव पोलीस ठाणेत फिर्याद दाखल

येळावी : प्रतिनिधी

तासगांव तालुक्यातील येळावी गावातील सिद्धेश्वर सहकारी पाणीपुरवठ्या वरील जॅकवेल ची 12.5 Hp ची मोटर चोरीस गेल्याचे दिसून आले.ही घटना 24 तारखेला गुरुवारी रात्रीच्या सुमारास झालेचे समजले.जॅकवेल वरील ऑफरेटरला सकाळी मोटर चालू करायला गेल्यावर पाण्यामध्ये मोटर नसल्याचे दिसून आले.

अशा प्रकारच्या शेतीपंप चोरीच्या घटना अगोदर बऱ्याच वेळा घडल्या आहेत.शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अगोदरच कमजोर असताना अशा चोरीच्या प्रकरणामुळे शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे.शेतीपंप चोरीस गेल्यामुळे शेतीचे नुकसान होत असल्याचे दिसून येत आहे. संबंधित शेतकऱ्यांनी तासगांव पोलीस ठाणेत तक्रार नोंद केली आहे.

येळावी सर्कल प्रतिनिधी : शुभम पाटील

Published by SK NEWS MARATHI