मध्यवर्ती वस्तू भांडार चे मालक पवनकुमार गंगवानी यांचेकडून अमोल माने सर यांचा सत्कार
तासगाव | प्रतिनिधी
मध्यवर्ती वस्तु भांडार तासगांव चे मालक पवनकुमार गंगवानी व त्यांचे सहकारी येरळा शिक्षण संस्था राजापूरचे ज्येष्ठ शिक्षक शिंदे सर व वसंतरावदादा पाटील माध्य.विद्यालय कांचनपूर सहा.शिक्षक सुर्यवंशी सर यांचेकडून संत नामदेव नुतन मराठी ज्ञाप्रबोधिनी तासगांवचे सहा.शिक्षक मा.श्री.अमोल एकनाथ माने सर यांना अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला क्रीडा मंडळ सांगली यांच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्या बद्दल त्यांचा शाल श्रीफळ बुके देऊन सत्कार पवनकुमार गंगवानी यांच्या हस्ते करण्यात आला.त्याचबरोबर त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.
सुर्यवंशी सर यांनी त्यांच्या कार्याची थोडक्यात माहिती सांगितली.स्कॉलशिप इ.5 वी ते 8 वी आवड अनेक विधार्थी गुणवत्ता निवड यादीत व गावोगावी हस्ताक्षर सुधार शिबीर आयोजन व मार्गदर्शन विद्यार्थांना काव्यनिर्मितीचे धडे देऊन शालेय विधार्थ्यांचा पुष्पगंध नावाचा काव्यसंग्रंह प्रकाशित इत्यादी त्यांच्या अनेक कार्याचा आढावा करून दिला.यावेळी उपस्थित वासुंबे गावचे उपसरपंच शिंदे सर ,पोलिस हवालदार सुर्यवंशी सर,ढवळी हायस्कूलचे मुख्याध्यापक मुल्ला सर ,पवनकुमार गंगवानी होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुर्यवंशी सर यांनी केले.व शेवटी आभार शिंदे सर यांनी मानून कार्यक्रम संपन्न झाला.
Published by SK NEWS MARATHI