जागतिक महिला दिन | चार शब्द | शब्दांकन : मिलिंद सुतार

जागतिक महिला दिन

महिला हा शब्द उच्चारला की आपल्या डोळ्यासमोर आपली ‘आई’ दिसते. ज्या आईने जन्माआधी नऊ महिने आपला भार वाहिला. ज्या आईमुळे आपल्याला जग दिसले. त्याच आईने आपल्याला चालायला, बोलायला आणि चांगले वागायला शिकवले. तिच आई आपल्या सुखदुःखात आपल्या पाठिशी ठामपणे उभी राहिली. आपल्या आजारपणात दिवसरात्र आपली काळजी घेतली. नेहमी आपल्या भल्याचाच विचार केला अशी आपली आई. आपल्यावर चांगले संस्कार करणारी आपली आजी आपल्या बहिणी आपल्या आत्या, आपल्या मावश्या, आपल्या मैत्रीणी आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे पत्नी. स्त्रीची ही विविध रुपं बघता बघता आपण मोठे होतो.
तलाठ्यापासून राष्ट्रपती पदापर्यंत आणि सरपंचापासून ते लोकसभेच्या सभापती पदापर्यंत सगळी पदं महिलांनी आपापल्या कर्तृत्वाने मिळवून दाखवली आहेत. कोणत्याही क्षेत्रात स्त्री आता मागे नाही. स्त्रीयांच्या या सर्वांगीण विकासामध्ये पुरुषांचे उदार धोरण सुध्दा दखलपात्र आहे. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतोच किंबहुना स्त्रीचा हात पाठिशी असल्याशिवाय पुरुष यशस्वी होणे शक्य नाही.
अशा या महिलांचा रोज आपण महिलांचा मान राखतोच परंतु वर्षातून एकदा त्यांचा उचित सन्मान करायला काय हरकत आहे ? त्यामुळेच आज जागतिक महिला दिनानिमित्त आपण सन्मान करु नारीशक्तीचा.
नारीशक्ती जिच्या शिवाय जग अपुर्ण आहे. नर आणि नारी ही परिपूर्ण जोडी परमेश्वराने तयार केली आहे. त्यामुळे दोघांनीही एकमेकांशी कृतज्ञ राहिले पाहिजे. एकमेकांच्या मदतीने नवनवीन यशाची शिखरे पादाक्रांत केली पाहिजेत.
सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
????????????????????????????

मिलींद सुतार
तासगांव जि.सांगली
????????????????????????