सुषमा कुंभार यांना आदर्श महिला सन्मान पुरस्कार प्रदान
कडेगाव | प्रतिनिधी (गोरखनाथ औंधे)
विविध सामाजिक कार्याच्या माध्यमातून काम करणाऱ्या खानापूर तालुक्यातील लेंगरे गावच्या सामाजिक कार्यकर्ती आदर्श सुषमा कुंभार यांना सामाजिक कामासाठी आदर्श महीला पुरस्कार रेणुका कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ मिरज व ग्रामविकास बहुउद्दैशीय संस्था मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने महिला बाल कल्याण अधिकारी सुवर्णा पवार, विनायक कुलकर्णी ,वैशाली पवार,राहीन आत्तार,युवराज मगदूम,माया गडदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पंचायत समिती मिरज सभागृहात देण्यात आला.
सुषमा कुंभार यांनी शिक्षीका म्हणुन काम करीत असताना सामान्य लोकासाठी महिला विद्यार्थ्यांसाठी अनेक सामाजिक उपक्रम गेली अनेक वर्षे राबवित आहेत. कोरोना काळात गरजुंना धान्य वाटप स्त्रियांसाठी तसेच विद्यार्थ्यांसाठी विविध समाज उपयोगी कार्यक्रम राबविले आहेत.त्यांच्या या कार्याचा गौरव या पुरस्काराच्या माध्यमातून झाला आहे. तसेच महिलांसाठी विविध प्रशिक्षण शिबीर व महिलांना प्रेरणा देण्यासाठी अनेक उपक्रम राबविले आहेत.
गरजु शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप व शैक्षणिक साहित्याचे वाटप व शैक्षणिक कार्यामध्ये सहकार्य करण्याचे काम सेवाभावी वृत्तीने त्यांनी केले आहे. या सर्व कामाची पोहचपावती म्हणूनच सुषमा कुंभार यांना हा पुरस्कार मिळाला आहे.
Published by SK NEWS MARATHI