आदर्श महिला सन्मान व आदर्श माता पुरस्कार कार्यक्रम मिरज येथे संपन्न
मिरज | प्रतिनिधी
दिनांक 8 मार्च 2022 रोजी जागतिक महिला दिनानिमित्त पंचायत समिती सभागृह मिरज येथे श्री रेणुका कला क्रीडा सांस्कृतिक व शैक्षणिक मंडळ मिरज आणि ग्रामविकास बहुउद्देशीय संस्था मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सांगली जिल्ह्यातील एकूण 26 महिलांना आदर्श महिला सन्मान व आदर्श माता पुरस्कार देण्याचा कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात पुरस्कार प्राप्त सर्व महिलांना फेटा बांधून त्यांचे ओक्षण करून त्यांचेवर पुष्प उधळून आरती करून करण्यात आले.यांनतर शाहीर रामलिंग तोडकर सर आणि त्यांच्या टीम यांनी महीलाविषयक पोवाडे गाऊन केली…तसेच कार्यक्रम उद्घाटन क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि भारतीय संविधान प्रास्ताविक यांना पुष्प अर्पण करून सौ दीपाली जाधव(माजी मुख्याध्यापक कन्या शाळा मिरज),सौ स्मिता शेळके (MSRLM मिरज तालुका अधिकारी), सौ निर्मला बस्तवडे (मालगाव) व सौ माणिक ताई माळी( माजी पंचायत समिती सभापती मिरज) यांच्या हस्ते तसेच दोन्ही संस्थेचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत झाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा परशुराम कुंडले सर व मा विनायक कुलकर्णी सर यांनी केले.यानंतर मुख्य अतिथी यांचे स्वागत दोन्ही संस्थेचे ट्रस्टी यांच्या हस्ते करण्यात आले. व उपस्थित मुख्य अतिथी यांनी महिलांना मार्गदर्शन केले यात महिला सर्व क्षेत्रात आघाडीवर असताना आज सावित्रीच्या लेकिना ज्योतिबा घडविण्याची महत्वाची जबाबदारी पार पाडावी लागणार आहे.कारण देश आणि समाज व भारतीय संस्कृती यांची जडणघडण स्त्रियांच्या हाती असते म्हणून त्यांचा सन्मान करणे खूप महत्वाचे आहे सदर कार्यक्रमाला त्यांनी मनोगतातून शुभेच्छा दिल्या. व सर्व २६ पुरस्कार वितरण या सर्व महिला अतिथी यांच्या हस्ते झाले ..पुरस्कार स्वरूप
शिल्ड,प्रमाणपत्र,गुलाबपुष्प असे होते.यात
“आदर्श महिला सन्मान पुरस्कार” पुढील महिलांना देण्यात आले
1. उज्वला अशोक मोरे (2.
ज्योती विवेक राजमाने 3.साक्षी गौराजे 4. नीता सुरेंद्र वाघमोडे 5.सौ शारदा विजय माळी 6.राहिन अझरुद्दीन अत्तार (मिरज)7.शुभांगी ज्योतीराम देशमुख (कडेगांव) 8.सविता दादासो मदने 9.माया शिवाजी गडदे (पलुस) 10.वैशाली श्रीकांत कांबळे (आटपाडी)11.श्रुती आशिष बीडकर(सांगली) 12. सुवर्णा गोरख पवार (जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी,सांगली महाराष्ट्र शासन) 13.सुषमा राजकुमार कुंभार (विटा) तसेच
“आदर्श माता पुरस्कार ” पुढील महिलांना देण्यात आले
1. सौ वनिता विनायक कुलकर्णी(मिरज) 2. सुरेखा श्रीधर सोनवणे 3. संगीता देवेंद्र मंडले 4. गीता रमेश गायकवाड 5.नासिराबी धुडूलाल शेख 6.कांचन प्रकाश जांभळे 7. भारती मल्लापा माळी 8.अनिता सिद्राम रामपुरे 9.रेणू मुलचंदानी 10.शोभा खलिफे(कडेगांव) 11.सरफराबी बशीर मुजावर (मिरज)12.विमल राजाराम ठाणेकर (इस्लामपूर)13.अरुणा मंगेश निकम या सर्व महिलांना देण्यात आले.
यानंतर पुरस्कार प्राप्त महिलांनी उत्स्फूर्तपणे मनोगते व्यक्त केली..आणि आभार मा रामलिंग तोडकर यांनी मानले…सदर कार्यक्रमास आटपाडी,कडेगांव, विटा,इस्लामपूर, पलुस,जत,सांगली आणि मिरज या तालुक्यातून बहुसंख्येने महिला उपस्थित होत्या.सदर कार्यक्रमाचे मुख्य संयोजन मा श्री परशुराम कुंडले (अध्यक्ष रेणुका कला क्रीडा सांस्कृतिक व शैक्षणिक मंडळ,मिरज) मा श्री रामलिंग तोडकर (उपाध्यक्ष श्री रेणुका मंडळ) श्री युवराज मगदूम (सचिव श्री रेणुका मंडळ), मा सौ कमल माळी (संचालिका रेणुका मंडळ) व ग्रामविकास बहुउद्देशीय संस्था मिरज चे सचिव मा विनायक कुलकर्णी सर यांनी केले होते.कार्यक्रमानंतर सर्वांना नाश्ता देण्यात आला.
Published by SK NEWS MARATHI