अमोल माने यांचा सलग दुसऱ्या पुरस्काराने सन्मान
जिल्हास्तरीय पुरस्कारानंतर आता राज्यस्तरीय पुरस्काराने गौरव
तासगाव | विशेष प्रतिनिधी :
मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी यांच्या वतीने गुणिजन गौरव पुरस्कार सोहळा 2022 पुणे शहरात संपन्न झाला .या मध्ये अमोल एकनाथ माने सर यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुरुगौरव शिक्षकरत्न पुरस्कारराने सन्मानित करण्यात आले. सन्मानचिन्ह, गौरवपदक, मानपत्र, महावस्त्र, मानकरी बॅच आणि मानाचा फेटा असे पुरस्काराचे स्वरूप होते.
सद्या ते जीवन विकास संस्था,तासगाव संचलित संत नामदेव नूतन मराठी ज्ञानप्रबोधिनी येथे विनाअनुदानित वर्गावर कार्यरत आहेत. त्यांचे मुळगाव चिंचणीनजीक भैरववाडी हे आहे. तासगाव शहरासह, तालुक्यातील चिंचणीसह बऱ्याच गावातील अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे.स्कॉलरशिप,नवोपक्रमासह विविध संकल्पना शालेय स्तरावर ते नेहमी राबवत असतात.
जानेवारी महिन्यात त्यांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला होता. जिल्हास्तरीय पुरस्कारानंतर मिळालेला राज्यस्तरीय पुरस्कार हा चालू वर्षातील सलग दुसरा पुरस्कार ठरला आहे.आजपर्यंतचे त्यांचे शिक्षणकार्य अधिकच उल्लेखनीय ठरत असून त्यांच्यावर पुन्हा एकदा शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
अभिप्राय देताना ते म्हणाले “राज्यस्तरीय पुरस्कार माझ्यासाठी अविस्मरणीय क्षण ठरला. हा दुसरा पुरस्कार कुटूंबासमवेत स्वीकारताना मन भारावून गेले.मला संघर्ष करायला शिकवणाऱ्या माझ्या आई-वडिलांचा आणि समस्त कुटूंबियांचा,माझ्या शिक्षक सहकाऱ्यांचा,माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचा खऱ्या अर्थानं हा राज्यस्तरीय सन्मान आहे” अशा प्रतिक्रिया त्यांनी दिल्या.
पुरस्कार मिळालेबद्दल बद्दल सामाजिक संस्था, शिक्षण संस्था,विविध स्तरातून अभिनंदनपर त्यांचा सत्कार केला जात आहे.
विशेष प्रतिनिधी : किरण देवकुळे
Published by SK NEWS MARATHI