बड्या धेंड्याना पायघड्या आणि शेतकऱ्यांवर जप्तीचा बुलडोझर ? – महेश खराडे

बड्या धेंड्याना पायघड्या आणि शेतकऱ्यांवर जप्तीचा बुलडोझर ? – महेश खराडे

कोरोना संपल्यावरही ऑनलाईन सभा कशासाठी?

19 मार्च रोजी बोंबाबोंब आदोलन | ‘तो’ निर्णय मागे घेईपर्यंत स्वाभिमानीचा ठिय्या

सांगली | प्रतिनिधी

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून बड्या धेंडाना पायघड्या आणि शेतकऱ्यांवर जप्तीचा बुलडोझर चालविण्याचा विचित्र प्रकार सुरू आहे.बड्या धेंडाची कर्जे माफ करण्याचा निर्णय मागे घ्यावा यासाठी जिल्हा बँके समोर शनिवार दिनांक 19 मार्च रोजी बोंबाबोंब आदोलन, तसेच जो पर्यंत निर्णय मागे घेतला जात नाही तो पर्यंत सांगली येथील जिल्हा बँकेच्या पुष्प राज चौकातील मुख्य कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला.
खराडे म्हणाले निनाई, डफळे, माणगंगा, यशवंत आदी कारखान्याच्या वाहतूक यंत्रणेची कर्जे, याशिवाय वसंतदादा शाबु, प्रकाश अग्रो , नेरला सोया, आदीसह अन्य संस्था ची सुमारे 100 कोटीची कर्जे आणि व्याज माफ करण्याचा निर्णय येत्या 19 मार्च रोजी होणाऱ्या बँकेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात येणार आहे. ही सभा ऑनलाईन घेण्यात येणार आहे.

ऑनलाईन सभा उधळून लावू

आता कोरॉना संपला आहे मग ऑनलाईन सभा कशासाठी ती ऑफलाईन घ्या अन्यथा सभा उधळून लावू असा इशारा देवून खराडे म्हणाले जिल्हा बँक शेतकऱ्याची आहे की नेत्याची आहे साखर कारखाने, सूतगिरण्या, यासाठी सुमारे एक हजार कोटीची कर्जे काढून थकविली आहेत सदर कर्जे काढून संस्थाही बंद पडल्या आणि बँक ही गोत्यात आणली नेत्याच्या कर्जाना वन टाईम सेटलमेंट योजना लागू आहे आणि शेतकऱ्यांना मात्र वन टाईम सेट ल मेंट योजना का लागू नाही हा मुख्य प्रश्न आहे

नेत्याची कर्जे माफ, शेतकऱ्याची ही माफ करा

शेतकऱ्याची पीक कर्जे, मध्यम मुदत कर्ज, ट्रॅक्टर सह अन्य वाहन कर्जे थकली की जप्तीची कारवाई , ट्रॅक्टर ओढून नेण्याची कारवाई , कर्ज पुरवठा बंद आणि नेत्याची कर्जे थकली की त्यांना चोर दरवाज्याने कायद्याच्या पळ वाटा काढून कर्जे दिली जात आहेत त्यांना पायघड्या घातल्या जात आहेत ज्यांची बँक आहे तो शेतकर्याना मात्र भिकार्यासारखे कर्ज मागावे लागते हे वास्तव आहे नेत्याची कर्जे माफ होत असतील तर शेतकऱ्याची ही कर्जे माफ करा अशी मागणी खराडे यांनी केली

 

बँकेचा राजकीय वापर थांबवा

जिल्हा बँक ही आर्थिक संस्था आहे.आर्थिक संस्थेत राजकारण आणू नये तू आमच्या पक्षात ये तुझी कर्जे माफ करतो आणखी कर्ज पुरवठा करतो हे सध्या सुरू आहे. बँक राजकारणाचा अड्डा बनली आहे.त्यामुळेच सर्व बुडवे ,थकबाकीदार बँकेचे संचालक बनले आहेत. संचालक व्हा , संस्थांच्या नावावर कर्जे काढा ती बुडवा. माफ करून घ्या.असला धंदा बँकेत सुरू आहे.बँक राजकीय अड्डा बनली आहे.आम्ही या पुढे बँकेचा राजकीय आखाडा बनू देणार नाही. ‘नेत्यांना एक आणि शेतकऱ्यांना वेगळा न्याय अशी दुहेरी भूमिकाही खपवून घेणार नाही.
त्यामुळेच या दुहेरी नीतीच्या विरोधात शुक्रवार दिनांक 19 मार्च रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हा बँकेसमोर बोंब ठोको आंदोलन आणि नेत्याची कर्ज माफी मागे घ्यावी यासाठी बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. तरी या आंदोलनात ज्या शेतकऱ्यावर जप्तीची कारवाई झाली आहे. ज्याची ट्रॅक्टर सह अन्य वाहने जिल्हा बँकेने ओढून नेली आहेत.अशा सर्व शेतकऱ्यांनी जिल्हा बँकेच्या पुष्पराज चौक सांगली येथील मुख्य कार्यालयासमोर जमावे असे आवाहन खराडे यांनी केले आहे.

Published by SK NEWS MARATHI