जलबिरादरी संस्थे कडून “अग्रणी नदी विश्वस्त संमेलन” चे आयोजन | संमेलनास उपस्थित राहण्याचे जलबिरादरी संस्थेकडून आवाहन | Sangli

जलबिरादरी संस्थे कडून “अग्रणी नदी विश्वस्त संमेलन” चे आयोजन..

संमेलनास उपस्थित राहण्याचे जलबिरादरी संस्थेकडून आवाहन

कवठेमहांकाळ प्रतिनिधी | तानाजी शिंगाडे


ठिकाण पद्मभूषण वसंत दादा पाटील महाविद्यालय कवठेमहांकाळ अग्रणी नदी खोऱ्यातील रहिवाशांना अथक परिश्रम करून जलबिरादरीच्या सोबतीने संत, समाज, शासन आणि महाजन या चार घटकांना एकत्रित करून आपल्या भागातील कोरड्या पडलेल्या अग्रणी नदीला वाहती केली, हे काम करत असताना संपूर्ण नदी खोऱ्यातील लोकांनी नदी विश्वस्तांची भूमिका बजावली. तसेच सामाजिक दृष्टिकोन ठेवून लोकांना या कामात जोडत गेले. यामध्ये लोकसहभागातून नदी पुनरुज्जीवनासाठी सिमेंट बंधारे बांधने, वन जमिनीवर डीप सी सी टी करणे, डोंगर उतारावर माती नाला बांध घालने, लुज बोल्डर डॅम तयार करणे,ओढ्याचे खोलीकरण व रुंदीकरण करणे, नदीपात्रात भुमीगत बंधारा तयार करणे, ओढा काठावरती बांबूच्या रोपाचे वृक्षारोपण करणे, वन जमिनीवर केलेल्या डीप सी सी टी वर बिया व रोपांची लागवड करणे, विहीर पुनर्भरण करणे, बोअर पुनर्भरण करणे, जुन्या तलावातील गाळ काढून पडीक जमिनीवर पसरून नापीक असणारी जमिनी सुपीक करून लागवडीयोग्य बनवणे आणि जुन्या तलावाची पाणी साठवण क्षमता वाढविणे, नवीन तलाव खोदणे, शेतकऱ्यांना व्यक्तिगत केशर आंब्याची रोपे वाटप करणे, रेनवाटर हार्वेस्टिंग करणे, रिचार्ज शाप्ट तयार करणे, मियावाकी वनराई प्रकल्प उभारणे, आशा प्रकारची अनेक जलसंधारणाची कामे लोकसहभागातून उभारली आहेत. हा नदी पुनरुज्जीवन करण्याचा पहिला टप्पा होता.
जागतिक जलतज्ञ डॉ.राजेंद्रसिंहजी यांनी आपल्या वाळवंटी भागात राजस्थान मध्ये नऊ नद्या बारमाही केल्या. या लोकसहभागातून बारमाही झालेल्या नदीवर विश्वस्त म्हणून काम केलेल्या लोकांनी दुसरी महत्त्वाची भूमिका राबवली ती म्हणजे नदी संसदेची स्थापना केली.
याच धर्तीवर अग्रणी नदी खोऱ्यातील रहीवास्यांनी हा पहीला टप्पा पुर्ण केला असुन आता वेळ आली आहे ती म्हणजे अग्रणी नदी संसंदेकडे वाटचाल करण्याची. या संपूर्ण नदी पुनरुज्जीवन प्रकल्पा मधे लोकांनी लोकसहभागाची महत्त्वाची भुमिका बजावली आहे. ते आता स्व:इच्छेने स्व:प्रेरणेने नदी संसदेचे सदस्य होणार नदी खोऱ्यातील प्रत्येक गावातील लोकांचे प्रतिनिधी आणि शासकीय अधिकारी नदीला येत्या काळात बारमाही वाहती ठेवणेसाठी पुर्ण जबाबदारी घेणार आहेत.अशा या नदी संसदेची मुळसुत्र समजुन घेण्याची प्रक्रिया समजून घेऊन येत्या काळात अग्रणी नादी संसद स्थापन करण्याकडे वाटचाल होईल.
या अनुषंगाने जल बिरादरी संस्थे कडुन अग्रणी नदी खोऱ्यातील लोकांचे १९ व २० मार्च ला जागतिक जलतज्ञ डॉ. राजेंद्रसिंहजी राणा साहेब, महाराष्ट्र राज्याचे विद्यमान जलसंपदा मंत्री मां.श्री. जयंत पाटील साहेब, सांगलीचे विद्यमान जिल्हाधिकारी मा.श्री. अभिजीत चौधरी साहेब, सांगलीचे माझी जिल्हाधिकारी मा.श्री.विजय काळम पाटील साहेब, मा.श्री.शेखर गायकवाड साहेब, मा.श्री. कुशवाह साहेब, व्हि प्रकाष राव, तेलंगणा,तसेच भारत भरातुन पाण्यावर काम करणारे मान्यवर मंडळी यांच्या उपस्थितीत कवठेमहांकाळ येथील पद्मभूषण वसंतदादा पाटील महाविद्यालय कवठेमहांकाळ येथे २ दिवसीय अग्रणी नदी विश्वसस्त संमेलन आयोजित केले आहे तरी आपण सर्व अग्रणी नदी खोऱ्यातील ग्रामस्थांनी कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे जलबिरादरी टीम कडून आग्रहाची विनंती करण्यात येत आहे.

Published by SK NEWS MARATHI