‘जागतिक ग्राहक दिनानिमित्त तासगांवात परिसंवाद | Sangli

‘जागतिक ग्राहक दिनानिमित्त तासगांवात परिसंवाद

तासगाव | प्रतिनिधी

तासगाव येथील तहसिलदार कार्यालयात १५ मार्च रोजी जागतिक ग्राहक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मा.तहसिलदार रविंद्र रांजणे यांना अचानक जिल्हाधिकारी कार्यालयात जावे लागल्याने त्यांचे प्रतिनिधी म्हणनू मा.नायब तहसिलदार नागेश गायकवाड यांच्या हस्ते विवेकानंद प्रतिमेच्या पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. नंतर फेयर डिजिटल फायनान्स या विषयावरील परिसंवादाची सुरुवात अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे मा.मिलींद सुतार यांनी केली. या परिसंवादात सध्या सुरु असलेल्या ऑनलाईन खरेदीमध्ये होणारी फसवणूक, मोबाईलवर येणारे फसवे संदेश, ए.टी.एम.सेवे बद्दल वाटणारी असुरक्षेची भावना तसेच यासंबंधी स्वतःला आलेले अनुभव सर्व उपस्थितांनी मांडले.

     या परिसंवादामध्ये तहसिल कार्यालयातील तालुका पुरवठा अधिकारी श्रीमती सविता कुंभार तसेच त्यांच्या सहकारी श्रीमती मनिषा कदम, पुरवठा निरीक्षक जयश्री माने पाटील, राज्य परिवहन मंडळाचे तासगांव आगार व्यवस्थापक मा.खरमाटे, भूमि अभिलेखचे मा.कोळी, दुय्यम निबंधक मा.विजय सोनावणे, सामाजिक वनीकरणचे मा.सचिन पाटगांवकर अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हा अध्यक्ष मा.सर्जेराव सुर्यवंशी, अ.भ.ग्रा.पंचायतीचे तालुका अध्यक्ष मा.माणिकराव पाटील, ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे विभागीय संघटक मा.आलमशहा मोमीन, धनंजय मोहिते, श्री.इनामदार वगैरे मान्यवर सहभागी झाले होते. सूत्रसंचालन मा.मिलींद सुतार यांनी केले.

Published by SK NEWS MARATHI