सांगली जिल्हा बॅंकेवर न्यायासाठी स्वाभिमानाचे ‘बोंब’ आंदोलन
बँकेकडून कर्जे ‘राईट ऑफ’ चा निर्णय मागे
सांगली | प्रतिनिधी .
सांगली जिल्हा बँकेवर स्वाभिमानीच्या वतीने धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी कार्यकर्ते बँकेत घुसले पोलीस आणि कार्यकर्त्याच्या मध्ये झटापट झाली. दरम्यान नेत्याची कर्जे राईट ऑफ करण्याचा निर्णय मागे घेण्या बरोबरच शेतकऱ्यासाठी वन टाईम सेटलमेन्ट योजना लागू करून ही पाच वर्षे सुरू ठेवू असे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी जाहीर केले.हे स्वाभिमानीच्या आंदोलनाचे यश असून अर्धी लढाई जिंकली आहे पण यापुढेही ही बँक शेतकऱ्याची राहावी नेत्याची होवू नये यासाठी रक्ताच्या शेवटच्या ठेंबापर्यंत लढत राहू असा इशारा जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला.
जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा बँकेवर सोमवारी मोर्चा काढण्यात आला.यावेळी घोषणाबाजी करत कार्यकर्ते मुख्य गेट वर आले त्यावेळी पोलिसांनी अडवले कार्यकर्ते आणि पोलिसांच्यात जोरदार झटापट झाली काही कार्यकर्ते दुसऱ्या गेटमधून आत घुसले त्यांना अटकाव करण्याचा प्रयत्न झाला त्यावेळी एकच दंगा झाला.
यावेळी बोलताना महेश खराडे म्हणाले पालक मंत्री जयंत पाटील यांच्या आशीर्वादाने बँकेचा राजकीय अड्डा करण्यात आला आहे. राष्ट्रवादी पक्षात घेण्यासाठी अनेकांच्या संस्थांना नियम बाह्य मदत करण्याचे धोरण घेतले जात आहे.त्यांच्या संस्थांची कर्जे राईट ऑफ करणे, व्याजात सवलत देणे, कर्जाचे पुनर्घटन करणे. आदींचा घाट घातला जात होता. मात्र आम्ही तो हाणून पाडला. राईट ऑफ चा निर्णय मागे घ्यायला भाग पाडले. तसेच शेतकऱ्यासाठी वन टाईम सेट्टल मेन्ट योजना लागू करायला भाग पाडली.ही योजना 2018 पर्यंत थकीत असणाऱ्या शेतकऱ्यासाठी च लागू केली होती. ती 2019 ते 2021 पर्यंत थकीत असणाऱ्या शेतकऱ्यासाठी ही पुढील पाच वर्षे लागू राहणार आहे. त्याच बरोबर नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना दोन टक्के व्याजात सवलत देण्यात येणार आहे.
मार्च नंतर बँकेचा ताळेबंद बघून एक टक्के व्याजात सवलत देण्याबाबत ही होकार दर्शिविला आहे.
अवकाळीने नुकसान झालेल्या द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यासाठी व्याजात सवलत देण्याचीही तयारी बँकेने दर्शिविली आहे. तसेच साखर कारखान्याच्या पुनर्घटन योजनेला ही स्थगिती दिली आहे.हे सर्व स्वाभिमानीच्या आंदोलनाचे यश आहे असे खराडे यांनी सांगितले.
बँकेच्या अध्यक्ष मानसिंगराव नाईक संचालक विशाल पाटील, मोहनराव कदम,पृथ्वीराज पाटील तानाजी पाटील, महेंद्र लाड, यांच्या बरोबर शिष्टमंडळाची चर्चा झाली. त्यावेळी बहुतांश मागण्या मान्य करण्यात आल्या. सकारात्मक चर्चा झाली. शेतकरी हिताचेच निर्णय घेवू अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी प्रा.शरद पाटील,साहेबराव पाटील, सदानंद कबाडगे,भागवत जाधव,संजय बेले,संदीप राजोबा,राजेंद्र माने,पोपट मोरे, बाबा सांड्रे,दिलीप पाटील,तानाजी साठे,प्रभाकर पाटील,जगन्नाथ भोसले, दामाजी दूबल, संदीप शिरोटे, महेश जगताप, सूरज पाटील, सरदार सावंत, विजय रेंदळकर, बाळासो खरमाटे, शिवलिंग शेटे, मुकेश चिंचावडे प्रताप पाटील, भैरवनाथ डवरी, शशिकांत माने , भुजंग पाटील, गुलाब यादव, आदीसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Published by SK NEWS MARATHI