राजापूर मध्ये राष्ट्रीय पेयजल अंतर्गत पाण्याची टाकी आणि पाईप लाईनचा भूमिपूजन सोहळा संपन्न
राजापूर | प्रतिनिधी : शुभम पाटील
तासगांव तालुक्यातील राजापूर गावामध्ये राष्ट्रीय पेयजल अंतर्गत नवीन पाण्याची टाकी व पाईप लाईन कामाचे भूमिपूजन कॉन्ट्रॅक्ट मोरे साहेब यांच्या उपस्थितीत झाले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष माननीय श्री .डी .के .नाना पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. त्यावेळी राजापूर गावचे सरपंच सौ.शुभांगी गाडे, उपसरपंच लक्ष्मण घळगे ,ग्रामपंचायत सदस्य सहदेव पाटील, गणपती पोळ, विमल चव्हाण ,रुपाली पवार ,विलास कोळेकर हे मान्यवर उपस्थित होते.तसेच
विकास सोसायटीचे संचालक जयसिंग पाटील ,सुभाष पोळ ,महादेव हिवरे ,बजरंग मारुती पाटील, शिवाजी बाबुराव पाटील, बाळासो देवकर ,शंकर कदम काशिनाथ वायदंडे सर ,संपत आनंदा काटकर.
तसेच ज्येष्ठ नेते नामदेव नारायण पाटील, आनंदा गुरुजी, गोविंद बापू ,मुरलीधर गुरुजी, शानुर पाक जादे,शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष माननीय दाजी पंडित पाटील,मनीषा घळगे, व ग्रामपंचायत चे सर्व कर्मचारी तसेच गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
गाव पाणीपुरवठा स्कीम मुळे सर्वांना स्वच्छ व भरपूर पाणी मिळणार असल्याने परिसरामध्ये ग्रामपंचायतचे कौतुक होत आहे.
Published by SK NEWS MARATHI