तहसीलदार “गो बॅक गो बॅक च्या” घोषणांनी कडेगाव तहसीलदार परिसर हादरला | कडेगाव तहसीलदार कार्यालयामध्ये सर्वपक्षीय कार्यकर्त्यांकडून बोंब मारू व शंखध्वनी आंदोलन | Sangli

तहसीलदार गो बॅक गो बॅक च्या” घोषणांनी कडेगाव तहसीलदार परिसर हादरला.

कडेगाव तहसीलदार कार्यालयामध्ये सर्वपक्षीय कार्यकर्त्यांकडून बोंब मारू व शंखध्वनी आंदोलन.

कडेगांव: प्रतिनिधी.
कडेगाव “तहसीलदार गो बॅक गो बॅक” घोषणांनी कडेगाव तहसीलदार परिसर हादरून गेला.वीस वर्षांमध्ये प्रथमच तहसीलदारांच्या कामगिरीवर नाराज कडेगाव तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी कडेगांव च्या तहसीलदार शैलजा पाटील यांच्या विरोधात कडेगाव तहसीलदार कार्यालयासमोर बोंब मारो व शंखध्वनी आंदोलन पाणी संघर्ष समितीचे.डी.एस देशमुख, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजेंद्र माने,वंचित बहुजन चे जीवन करकटे, यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये केले.
कडेगाव तालुक्यातील येरळा नदीमध्ये सरकारने वाळू उपशाला बंदी घातली असून देखील वांगी, शेळकबाव,हणमंतवडिये या सर्वच भागांमध्ये वाळू तस्करांकडून खुलेआमपणे जेसीबी,डंपर,ट्रॅक्टर च्या सहायाने अवैधरित्या वाळू उपसा जोमाने सुरू आहे.
येरळा नदीतील अवैध वाळू तस्करी तात्काळ रोखावी, तहसिलदारांची चौकशी करावी, तहसीलदार कार्यालयातील सर्वच विभागांमध्ये सर्वसामान्य जनतेकडून लाच घेतल्याशिवाय कामे पूर्ण होत नाहीत, सर्वसामान्यांची पुरवठा विभाग,सेतू इत्यादी विभागातील कामे लवकरात लवकर व्हावीत या मागणीचे निवेदन नायब तहसीलदार भिसे यांना देण्यात आले.
यावेळी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी तहसीलदार व पोलीस प्रशासन,महसूल प्रशासन यांच्या विरोधात बोंबाबोंब आंदोलन केले, तहसीलदार गो बॅक गो बॅक, पाकीट मला वाळू तुम्हाला, महसूल प्रशासनाचा धिक्कार असो इत्यादी घोषणा देत बोंबाबोंब आंदोलन सर्वपक्षीय कार्यकर्त्यांकडून करण्यात आले.
यावेळी नगरसेवक संदीप काटकर, मा. नगराध्यक्ष वैभव देसाई,प्रमोद मांडवे,किरण गायकवाड,अमोल पाटील,अनिकेत गायकवाड,बाळासाहेब जाधव,आनंद जंगम,प्रल्हाद माळी, जितेंद्र सोरटे, परशुराम माळी,सागर गायकवाड, सागर लाटोरे, सोमनाथ पवार, बाळासाहेब वत्रे,राहूल चन्ने व सर्वपक्षीय कार्यकर्ते ग्रामस्थ या बोंब मारू, शंख ध्वनी आंदोलनाला उपस्थित होते.

Published by SK NEWS MARATHI