१८व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेच्या रंगभूषामध्ये चिंचणीच्या सागर जाधव यांना प्रथम क्रमांकाचा बहुमान | Sangli

१८व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेच्या रंगभूषामध्ये चिंचणीच्या सागर जाधव यांना प्रथम क्रमांकाचा बहुमान

सांगली / वृत्तसेवा

तासगांव तालुक्यातील चिंचणी गांवचे प्रसिध्द राष्ट्रीय रंगावलीकार ख्यातनाम चिञकार,
गुरुवर्य दादोजी कोंडदेव सैनिकी शाळा , तासगांव या शाळेचे आदर्श कलाशिक्षक श्री सागर कृष्णा जाधव यांनी महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने अठराव्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेसाठी रंगभूषा या विभागात तब्बल २७ नाटकांमधून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक सौ.प्रिती बापट लिखित ” काठीची कमाल फुल – टू – धमाल या नाटकासाठी प्राप्त झालेली आहे जाधव यांना दिग्दर्शक श्री.योगेश साने सर यांचे अनमोल सहकार्य लाभले समाजप्रबोधनपर या रंगभूषामधून पेटींग मेसेज देण्यात आलेला होता. सदरची रंगभूषा साकारण्यासाठी फक्त अर्धा तास लाभले त्यांच्या अथक कलेचं परीश्रम हे सांगली जिल्ह्यालाच नव्हे तर महाराष्ट्राला अभिमानाची गोष्ट आहे जाधव यांनी आजअखेर चिञकला,रांगोळी ,शिल्पकला,
माध्यमातून राज्य व राष्ट्रीय स्तरावर जनजागृती केलेली आहे . सदरच्या स्पर्धा या २१मार्च ते २६ मार्च २०२२ या कालावधीत संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह कोल्हापूर व विष्णूदास भावे नाट्यगृह , सांगली येथे अतिशय जल्लोषात झालेल्या स्पर्धेत एकूण २७ नाट्यप्रयोग सादर करण्यात आले होते .स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून श्री.नरेंद्र आंगणे , श्री.शेखर वाघ आणि श्रीमती अंजली धारु यांनी काम पाहिले जाधव यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाल्याबद्दल सांस्कृतिक कार्य संचालक मा.श्री विभिषण चवरे ( साहेब ) यांनी अभिनंदन केले आहे तसेच
सांगली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष
मा.श्री.नितिन खाडिलकर ( साहेब ) व संचालक मा.रविंद्र देवधर ( साहेब ) यांनीसुद्धा अभिनंदन केले आहे दरम्यान शाळेचे
कमांडंट मा.प्रशांत पवार
मुख्याध्यापक मा.विजय शेंडगे
अधिक्षक मा.अरुण थोरात यांनी कलाशिक्षक सागर जाधव सर, शाळेचे श्री योगेश साने सर यांचा शाळेच्यावतीने भव्य सत्कार करण्यात आला व भावीवाटचालीस सर्वांनीच शुभेच्छांचा वर्षांव केला.

घरीच रहा सुरक्षित रहा कोरोनावर अनेक समाजप्रबोधन रंगावलीतून केलेले आहे यामध्ये एकोफ्रेंडली गणेश मुर्ती,पर्यावरण वाचवा, दारुबंदी,स्ञी भ्रूणहत्या,मुलगी वाचवा अशा अनेक उपक्रमाचा समावेश आहे.प्रत्येक संकष्टीला तासगांवच्या श्री गणेश मंदिरात सुमारे सहा ते सात वर्षे झाली अविरत अखंड प्रबोधनात्मक रांगोळीच्या माध्यमातून सेवा केली कुणाकडूनही एक रुपया न घेता .आदर्श कार्यकर्तृत्वसंपन्न व्यक्तीमत्वाच्या असलेल्या जाधव यांना यासाठी त्यांना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.डिझीटलच्या दुनियेत चिञे व पोस्टर प्रदर्शन रांगोळी , मातीच्या मुर्ती लुप्त होताना दिसत आहेत.माञ या कला जाधव जपत आहेत.पैसा आणि प्रसिद्धीसाठी नाही तर आईवडीलांच्या डोळ्यांतून निघणाऱ्या आनंदाअश्रुंसाठी जगायचं असतं अशा ध्येयाने प्रेरीत झालेल्या आदर्श कलाशिक्षकांची गरज आज संपूर्ण देशाला आहे.त्यांनी प्रतिकुल परिस्थितीशी लढा देत आत्मविश्वासाने कलाक्षेञात आजवर चौफेर घौडदौड सुरु ठेवली आहे .समाजकार्यातून चांगल्या समाजाची निर्मिती ,प्रत्येक भारतीय जाज्ज्वल्य देशप्रेमाने पेटून उठावा यासाठी कलाशिक्षक सागर जाधव यांची चाललेली धडपड खरंच कौतुकास्पद आहे …आपल्या या अखंड ,अभेद्य धडपडीस सदैव यश येईल असा आमचा विश्वास आहे एक आदर्श आणि कर्तृत्वसंपन्न व्यक्तीमत्व म्हणून भावी युवापिढी आपला आदर्श घेतच राहील…

Published by SK NEWS MARATHI