डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे गावकुसातला सामान्य माणूस सक्षम झाला : खासदार संजयकाका पाटील
तासगावात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
तासगाव | प्रतिनिधी –
भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे गावकुसातला सामान्य माणूस सक्षम झाला असे प्रतिपादन खासदार संजयकाका पाटील यांनी व्यक्त केले.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131व्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित अभिवादन सभेत ते बोलत होते. तासगाव येथील भारतरत्न डॉ आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी आमदार सुमनताई पाटील, दलितमित्र बहुजन नेते भीमरावभाऊ भंडारे, तहसीलदार रवींद्र रांजणे, डी वाय एस पी अश्विनी शेंडगे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील,माजी नगरसेवक मोहनाना कांबळे, रिपाईचे सांगली लोकसभा मतदारसंघ जिल्हाध्यक्ष संदेश भंडारे, तालुका जयंती महोत्सव समितीचे उपाध्यक्ष दिपकबाबा अमृतसागर, बीडीओ दीपा बापट आदी प्रमुख उपस्थित होते.
यावेळी खासदार संजयकाका पाटील पुढे म्हणाले, डॉ बाबासाहेबांच्या कार्याचा आणि विचारांची आज जगाला गरज आहे, आधुनिक भारताची पायाभरनी आंबेडकरांनी संविधानाद्वारे केली.
तहसीलदार रविंद्र रांजणे यांनी बाबासाहेबांच्या कार्याचा आढावा घेत बाबासाहेबांच्या शैक्षणिक व अर्थकारणाचा अभ्यास युवकांनी केला पाहिजे असे आवाहन केले.
यावेळी डी वाय एस पी अश्विनी शेंडगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विश्वासराव पाटील, मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील,बहुजन नेते भिमरावभाऊ भंडारे आदींची भाषणे झाली.
स्वागत व प्रास्ताविक अध्यक्ष संदेश भंडारे यांनी केले, तर सूत्रसंचालन रोहन कांबळे यांनी केले.
यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी प्रकाश कांबळे, कृषी अधिकारी सर्जेराव अमृतसागर, प्राचार्य व्ही जी परीट, भाजप तालुकाध्यक्ष सुनील पाटील,शेकाप तालुकाध्यक्ष पांडुरंग जाधव, रिपाई तालुकाध्यक्ष प्रविण धेंडे, माजी नगराध्यक्ष अमोल शिंदे, जाफरभाई मुजावर, बाबासाहेब पाटील, नगरसेवक अनिल कुत्ते, किशोर गायकवाड, नगरसेविका सुरेखा साळुंखे, सुवर्णा माळी, सुधीर काळबागे, अरुण खरमाटे, काँग्रेस शहराध्यक्ष शरद शेळके, मुन्ना कोकणे, ऍड मोहसीन मुजावर, सुधीर नलवडे, तलाठी पतंगराव माने, स्वप्नील जाधव, महिंदा कांबळे, दिनेश लोखंडे, माजी नगरसेविका नलिनी पवार, युवा नेते अभिजित पाटील, उमेश गावडे, वसंतआबा चव्हाण, यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्यासंख्येने उपस्थित होते. शेवटी आभार तालुका जयंती समितीचे उपाध्यक्ष दीपकबाबा अमृतसागर यांनी मानले.
Published by SK NEWS MARATHI