तासगाव मधील श्री गणेश चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे श्री हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न
तासगाव | प्रतिनिधी
तासगाव मधील श्री गणेश चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत श्री हनुमान जन्मोत्सव 2022 मोठ्या उत्साहात पार पडला. तासगाव मधील मध्यवर्ती पोस्ट ऑफिस च्या नजीक असणाऱ्या स्वयंभू मारुती मंदिरामध्ये सदरचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कोरोना नियमांच्या शिथीलते मुळे यावर्षी स्वयंभू हनुमान मंदिर तासगाव येथे श्री हनुमंतांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
तासगाव मध्ये शनिवार दिनांक 16 एप्रिल 2022 रोजी भारतीय संस्कृतीला अनुसरून श्री गणेश चारीटेबल ट्रस्ट तासगाव यांचेमार्फत सदरचा श्री हनुमान जन्मोत्सव मोठ्या आनंदात व विविध उपक्रमांनी भक्तांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. पहाटे साडेपाच (५:३०) वाजता श्री मारुतीरायाच्या जन्म काळाचे आख्यान श्री नितीन जोशी सर तासगाव यांचेमार्फत भक्त वृंदावन समोर मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडले. याच प्रसंगी जन्मोत्सवाची फुलेही भक्तगणांकडून भावपूर्वक वाहण्यात आली व “बजरंग बली की जय “या जय घोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. यानंतर सौ अंकिता शंतनू जोगळेकर यांनी जन्मोत्सवाचा पाळणा अतिशय सुरेल आवाजात गायला व वातावरण भक्तिमय केले. यानंतर श्री हनुमंत यांच्या सवाद्य मिरवणुकीने अगदी प्रातःकाळी तासगावकर यांची मने भक्तीच्या वातावरणाने मंत्रमुग्ध झाली. यानंतर सर्व भक्तजनांनी महाप्रसादाचा आस्वादही घेतला. सायंकाळी श्री गजानन भजनी मंडळ तासगाव यांचेमार्फत भजन संध्या आयोजित करण्यात आली होती. यानंतर रात्री गायक श्री व सौ प्रकाश पवार यांनी भक्तिगीतांची सुरेल अशी सुमने श्री मारुतीरायाच्या चरणी अर्पण केली व या कार्यक्रमास भक्तगणांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. सदर कार्यक्रमासाठी श्री शंतनू दिलीप जोगळेकर , श्री विलास कदम व कुमार प्रज्वल गोसावी यांनी वाद्यवृंदाची साथ उत्कृष्टपणे गायकांना दिली. कार्यक्रमाचे निवेदन सौ गौरी फौजदार यांनी प्रभावीपणे केले.अशाप्रकारे अतिशय उत्साहात मध्ये श्री गणेश चारीटेबल ट्रस्ट तासगाव यांचेमार्फत सदरचा श्री हनुमान जन्मोत्सव 2022 मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.
Published by SK NEWS MARATHI