जयराम स्वामी वडगावच्या सुरेश होनराव यांच्या कुटुंबाने दिला कौटुंबिक एकतेचा विचार | Sangli

जयराम स्वामी वडगावच्या सुरेश होनराव यांच्या कुटुंबाने दिला कौटुंबिक एकतेचा विचार

जयराम स्वामी वडगावच्या सुरेश होनराव यांच्या कुटुंबाने दिला कौटुंबिक एकतेचा विचार त्यासाठी त्यांनी सर्व नातेवाईकांना बोलावून कौटुंबिक एकतेचा सोहळा कराड तालुक्यातील बेलदरी येथील आपल गाव येथे सर्व नातेवाईकांनी एकत्र येवुन साजरा केला.

होनराव कुटुंबाचे प्रमुख अमोल होनराव व त्यांचे पाच आत्तेभाऊ योगेश शेटे ओंड मनोज मांगले काले दौलत चिखले मलवडी सागर शेटे व अविनाश शेटे ओगलेवाडी शिव प्रसाद डोईजड नवे पारगाव यांनी एकत्र येवून ही कल्पना साकारली आहे यामध्ये होनराव परिवारातील सर्व घनीष्ठ नातेवाईकांना एकत्रीत करुन जुन्या आणी नव्या पिढीचा संगम घडविण्याचे कार्य केले आहे या माध्यमातून कुटुंबात लहानांपासून मोठ्या पर्यंत एक दिलाने काम करण्यासाठी विचारांची देवाणघेवाण करण्याची वृत्ती यामध्ये दिसुन आली
आज समाजामध्ये विभाजन होवुन अनेक दुभंगलेली कुटुंबे आपण पाहीली आहेत परंतु विचाराने एकत्र येणारी कुटुंबे हा होनराव कुटुंबाचा आदर्श समाजाने घेतला पाहिजे
अमोल होनराव यांच्या या कल्पनेला सर्व नातेवाईकांनी पाठबळ दिले तसेच अशा पध्दतीचे उपक्रम येणाऱ्या काळात प्रत्येक कुटुंबाने राबविले पाहीजे तरच कौटुंबिक एकता व एकत्र कुटुंब पध्दती जिवंत राहील लहान मुले व वयोवृद्ध यांच्यामधील पुसत चाललेला जिव्हाळा पुन्हा अधोरेखित करण्याचे काम या कुटुंबाने या माध्यमातून केल्याचे दिसून येत आहे.

Published by SK NEWS MARATHI