गव्हाणचे सुपुत्र,देशसेवक अनंतात विलीन
जवान अमोल एकनाथ पवार यांना शोकाकुल वातावरणात अखेरचा निरोप
प्रतिनिधी | गव्हाण (राजू यादव)
गव्हाण तालुका तासगाव गावचे सुपुत्र भारतीय सैन्य दलातील युनिट पाच पॅराचे जवान अमोल एकनाथ पवार (वय३०) यांना गुरुवारी शोकाकुल वातावरणात अखेरचा निरोप गव्हाण विठ्ठल नगर परिसरात देण्यात आला. बारा वर्षाच्या देश सेवेत कार्यरत असताना त्यांचे कमांडो हॉस्पिटल लखनऊ येथे अल्पशा आजाराने निधन झाले. दि.१२ रोजी गुरुवारी सकाळी घरी आणले. त्यावेळी आई, वडील, पत्नीसह नातेवाईकांनी हंबरडा फोडला. गावातील माजी सैनिक ग्रामस्थ यांनी सजवलेल्या ट्रॅक्टरमधून पार्थिव अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आले.
त्यावेळी सुभेदार सुरेश भोले आणि सहकारी , तासगावचे तहसीलदार रवींद्र रांजणे, पोलीस निरीक्षक संजीव झाडे, तलाठी शिवाजी चव्हाण, सर्कल मॅडम, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सुरेश (भाऊ) पाटील, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष विश्वास तात्या पाटील, हणमंत (आप्पा) देसाई , सरपंच हणमंत पाटील, उपसरपंच रावसाहेब सरवदे, ग्रामसेविका मुजावर मॅडम, पोलीस पाटील, विकास सोसायटीचे चेअरमन विनायक पाटील, व्हा.चेअरमन विनायक सरवदे तसेच गावातील ग्रामस्थ, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करुन भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
Published by SK NEWS MARATHI