डॉ. ऋषिकेश काळे पाटील यांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान
विश्वविख्यात आंतरराष्ट्रीय मानवाधिकार सामाजिक न्याय आयोगाचा राष्ट्रीय गौरव सोहळा नुकताच पार पडला..
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांना राष्ट्रीय स्तरावर सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
या सोहळ्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष मा. डॉ. संतोष बजाज सर, राजस्थान हुन आलेले मुख्य सचिव मा. सुरेश कुमार सर, राष्ट्रीय जनसंपर्क अधिकारी मा. बाबुलाल यादव जी, हरियाणा हुन आलेले R. T. I. चे अध्यक्ष मा. रावसाहेब धनवीर सर, गोव्याच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा मा. ऐश्वर्या साळगावकर मॅम यांच्या प्रमुख उपस्थितीत मला NATIONAL BEST SOCIAL ACTIVISTS AWARD या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
राष्ट्रीय स्तरावर माझा सन्मान होणे हे माझ्यासाठी आनंदाची बाब असली तरी, या मध्ये मला नेहमी प्रेरणा देणारे माझे कुटुंबीय, मित्र – मैत्रीण, तसेच लहान – थोर सन्मानिय विविध क्षेत्रातील मान्यवर यांचाही सिंहाचा वाटा आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
त्यांना मिळालेल्या पुरस्कारामुळे त्यांच्या वर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Published by SK NEWS MARATHI