महादेव नानांच्या पाठीशी ताकद उभी करा
अजितराव घोरपडे
सर्व पक्षीय आयोजित आरोग्य शिबिरात तासगावकरांना आवाहन
तासगाव | प्रतिनिधी
कोविड च्या काळात तालुक्यातील प्रस्थापित नेते गायब झालेले असताना महादेव नाना व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेले काम आपण सगळ्यांनी पाहिले आहे. नाना लढणारा माणूस आहे. अशी माणसे टिकली पाहिजेत कारण ती समाजासाठी गरजेचे आहेत अशा माणसाच्या पाठीशी उभे रहाणे हे समाजाचे कर्तव्य आहे म्हणूनच महादेव नानांच्या पाठीशी ताकद उभी करा असे आवाहन तासगावकरांना माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी केले.
महादेव नाना यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित आरोग्य शिबिरात घोरपडे बोलत होते.यावेळी व्यासपीठावरील तालुक्यातील दिग्गज सर्व पक्षीय नेत्यांची उपस्थिती चर्चेचा विषय होती.
तासगाव नगरपालिकेचा तेरा नंबर शाळेत आदित्य हॉस्पिटल सांगली यांच्या सहकार्याने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात रुग्णांची मोफत अँजिओग्राफी करण्यात आली त्याचबरोबर रुग्णांची डोळे तपासून मोफत चष्मे वाटप करण्यात आले
या कार्यक्रमाला तालुक्यातील ज्येष्ठ नेते शंकर दादा पाटील गुलाब काका पाटील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे शिवसेनेचे तालुका अध्यक्ष प्रदीप काका माने पाटील जि प सदस्य संजय पाटील किशोर उनऊणे दिलीप सावकार पवार माजी नगरसेवक चंपालाल कोटेचा दशरथ चव्हाण संभाजी सूर्यवंशी तासगाव अर्बन बँकेचे उपाध्यक्ष कुमार काका शेटे बंडू शेटे शिवसेनेचे शहराध्यक्ष विशाल शिंदे डॉ शरद सावंत डॉक्टर आशिष गाढवे उपस्थित होते
यावेळी बोलताना महादेव नाना पाटील यापुढील काळातही लोकांच्या प्रश्नासाठी संघर्ष करत राहण्याची ग्वाही दिली. त्यासाठी व्यासपीठावर असणाऱ्या सर्वच नेत्यांची साथ कायम राहील असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी बोलताना डॉ आशिष गाढवे यांनी आरोग्य शिबिराचे सध्याच्या ताण-तणावाच्या काळात असणारी गरज स्पष्ट केली. तर नेताजी घाडगे यांनी तासगाव शहर आणि तालुक्यात नागरिकांच्या आरोग्याच्या बाबतीत सांगली इस्लामपूर च्या तुलनेने मोठी हेळसांड होत असल्याबाबत खंत व्यक्त केली.
कार्यक्रमाचे संयोजन माजी नगराध्यक्ष संजय पवार शरद शेळके रवींद्र साळुंखे महेश पाटील गजानन गेले विकास धनवडे ऋषिकेश पाटील अमित जाधव पृथ्वीराज अरुण पाटील मोहन पाटील राजू बांगर पिनु सूर्यवंशी विलास पवार आनंदा पवार बंडू पाटील यांनी केले. सूत्रसंचालन अमोल सूर्यवंशी यांनी तर स्वागत प्रास्ताविक महेश पाटील यांनी केले.
शिबिरात एकूण 539 रुग्णांची तपासणी झाली
Ortho-112
Burn/plastic-35
Cardic-52
General surgery-75
Opthal-265P
Published by SK NEWS MARATHI