येळावी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत विधवा प्रथा निर्मूलन ठराव मंजूर |Tasgaon

येळावी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत विधवा प्रथा निर्मूलन ठराव मंजूर

(प्रतिनिधी : शुभम पाटील)

येळावी ता.तासगांव येथील ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित ग्रामसभेत , महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या परीपत्रकानुसार येळावी येथे अनिष्ट विधवा प्रथा पाळण्याच्या विरोधात चर्चा करून ठराव घेण्यात आला..
सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच वनिता जाधव होत्या.
याबाबतचा मुद्दा
शिवसेना महिला विभाग प्रमुख शोभाताई गावडे यांनी मांडला,सध्या पतीच्या निधनानंतर पत्नीचे कुंक पुसणे, मंगळसूत्र तोडणे, बांगड्या फोडणे, पायातील जोडवी काढणे यासारख्या प्रचलित असलेल्या अनिष्ट प्रथा बंद करून संबंधित महिलांना कोणताही दुजाभाव न करता वागविणे असे ठरविण्यात आले व त्याप्रमाणे ठराव घेण्यात आला, तसेच याबाबत जनजागृती करून या ठरावाची अंमलबजावणी करण्याचे ठरले..
याप्रसंगी ग्रामसेवक ए एल लोखंडे, युवा नेते विशाल दादा पाटील, ग्रामपंचायत सदस्य जयदेव कांबळे, मौला शिकलगार ,अनिता पाटील इतर ग्रामपंचायत सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.

 

Published by SK NEWS MARATHI