पर्यावरण रक्षणासाठी वृक्षारोपण करू या-प्राचार्य डॉ. बी.एम.पाटील
तासगाव -निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी सर्वांनी वृक्षारोपण केले पाहिजे,प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या वाढदिवसाला किमान एक झाड लावावे आणि ते जगवण्याचा प्रयत्न करावा. कुंडी मधील झाडे ही आपल्या घराची शोभा तर वाढतातच पण आपल्याला मुबलक प्रमाणात ऑक्सिजन उपलब्ध करून देतात,असे प्राचार्य डॉ.बी.एम.पाटील यांनी पर्यावरण दिनाच्या कार्यक्रमात सांगितले.
संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालय तासगाव येथे जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पर्यावरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शास्त्रीय पद्धतीने कुंडी कशी भरायची आणि त्यामध्ये रोपांची लागवड कशी करावी यासंदर्भात प्राचार्य डॉ.बी. एम.पाटील यांनी उपस्थित प्राध्यापक व प्रशिक्षणार्थींना प्रत्यक्ष शास्त्रीय पद्धतीने कुंडी भरून झाडाची लागवड करण्याचे प्रात्यक्षिक दाखवले. त्यानंतर शास्त्रीय पद्धतीने विद्यार्थिनींनीकडून कुंडीमध्ये झाडांची लागवड करण्याची एक दिवसीय कार्यशाळा घेतली.
कार्यशाळेच्या नियोजनाचे मार्गदर्शन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.बी.एम.पाटील यांनी केले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी प्रा.डॉ.एम.एस. उभाळे,प्रा.डॉ.ए.टी.पाटील, प्रा.डॉ.अर्चना चिखलीकर प्रा. डॉ.लक्ष्मी भंडारे व ग्रंथपाल प्रा.ए.जी.पाटील यांनी प्रयत्न केले. तर श्री.आर. एस.कुंभार,श्री.शशिकांत कोठावळे व श्री.एच.टी.वाघमारे यांनी सहकार्य केले.
Published by SK NEWS MARATHI