सरसकट सर्व नियमीत कर्जदारांना 50 हजार अनुदानाबाबत बैठकीत समाधानकारक निर्णय न झाल्यास 9 ऑगस्ट या क्रांतीदिनी पेठ नाका येथे राष्ट्रीय महामार्ग रोखणार : स्वाभिमानीचा इशारा

बैठकीत समाधानकारक निर्णय न झाल्यास 9 ऑगस्ट या क्रांतीदिनी पेठ नाका येथे राष्ट्रीय महामार्ग रोखणार : स्वाभिमानीचा इशारा

सांगली : प्रतिनिधी

येत्या कॅबिनेट बैठकीमध्ये मध्ये सरसकट सर्व नियमित कर्जदारांना 50 हजार रुपये प्रोत्साहन पर अनुदान देऊ कोणतेही निकष लावणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री मा एकनाथ ‌शिंदे यांनी मा राजु शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला दिली आहे. त्यामुळे सोमवारी होणारे आंदोलन स्थगित करण्यात आले असुन सरसकट अनुदान देण्याचे आश्वासन न पाळल्यास 9 ऑगस्ट रोजी पेठ नाका येथे राष्ट्रीय महामार्ग रोखणार अशा ईशारा स्वाभिमानाचे जिल्हाध्यक्ष मा महेश खराडे यांनी दिला .

महाविकास आघाडी सरकारने
नियमित कर्जदारांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता मात्र ते देताना त्यांनी जे निकष लावले त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळला नाही पूरग्रस्त शेतकरी यापासून वंचित राहतोय त्याचबरोबर आडसाली ऊस लागण करून कर्ज घेतलेला शेतकरी या योजनेपासून वंचित राहतोय केवळ 10% टक्के शेतकऱ्यांनाच याचा लाभ मिळणार आहे त्यामुळे त्या योजनेला आमचा विरोध होता ते निकष बदलावेत आणि सरसकट सर्वच नियमित कर्ज कर्जदार शेतकऱ्यांना 50000/- प्रोत्साहनपर अनुदान द्यावे अशी आमची प्रमुख मागणी आहे नव्या सरकारने महाविकास आघाडी सरकारचा निर्णय रद्द ठरवला म्हणजे सरकार नेमके कुणाचे आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे पूर्वीच्या सरकारने लावलेले निकष बदलावेत आणि नव्या सरकारने रद्द केलेला निर्णय मागे घेऊन सरसकट नियमित कर्जदारांना 50000 प्रोत्साहन पर अनुदान द्यावे या प्रमुख मागणीसाठी कोल्हापूर येथे राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला या मोर्चाला प्रचंड प्रतिसाद मिळाला
त्यामुळे नव्या शिंदे सरकारने प्रोत्साहन अनुदान देण्याचा जो निर्णय रद्द केला होता तो मागे घेतला सोमवारी सांगली येथे राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात येणार होता त्या पार्श्व भूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चर्चेसाठी मुबईला येण्याचे निमंत्रण दिले होते त्यानुसार राजू शेट्टी,प्रा जालिंदर पाटील सावकार माडणाईक यांच्या नेतृत्वाखालील शिषटमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्याशी चर्चा सविस्तर चर्चा झाली यावेळी दोघांनीही सरसकट अनुदान देवू कोणतेही निकष लावणार नाही अशी ग्वाही दिली हे सर्व निर्णय कॅबिनेट बैठकीत घेवू मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार असून विस्तारानंतर 19 जुलै रोजी पहिली कॅबिनेट बैठक होणार आहे त्या बैठकीत तो निर्णय घेवू अशी ग्वाही त्यांनी दिली आहे त्यामुळे 18 जुलै रोजी होणारे मोर्चा आंदोलन स्थगित करण्यात आले असून बैठकीत समाधानकारक निर्णय न झाल्यास 9 ऑगस्ट या क्रातीदिनी पेठ नाका येथे राष्ट्रीय महामार्ग रोखणार असल्याचा इशारा जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला खराडे म्हणाले कोणत्याही परिस्थितीत आम्ही नियमित कर्जदारांना 50 हजार अनुदान घेतल्याशिवाय स्वस्त बसणार नाही त्यासाठी शेवट पर्यंत संघर्ष करू.

Published by….SK NEWS MARATHI