1 ऑगस्टला स्वाभिमानीचा भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्विराज बाबा देशमुख यांच्या बंगल्यावर मोर्चा : मा.खराडे
बोरगाव येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शाखाचे उद्धाटन
तासगाव | प्रतिनिधी
तासगाव आणि नागेवाडी साखर कारखान्याच्या थकीत ऊस बिलाचा लढा यशस्वी झाला आहे आता केन अग्रॉ कारखान्याच्या थकीत ऊस बिलासाठी चळवळ सुरू करण्यात येत असून एक ऑगस्ट रोजी पृत्विराज बाबा देशमुख यांच्या बंगल्यावर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला
बोरगाव ता तासगाव येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शाखा उदघाटन सोहळा पार पडला त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते शाखाध्यक्ष मा चंद्रकांत पाटिल तर शाखाउपाध्यक्ष महादेव पवार शाखा पक्ष अध्यक्ष अनिल पाटील शाखा पक्ष उपाध्यक्ष प्रतिक पाटील कार्याध्यक्ष शामराव पवार उपकार्याध्यक्ष विनायक शिंदे खजिनदार रविंद्र पाटील व जितेद्र पाटील यांची निवड करण्यात आली
यावेळी खराडे म्हणाले शेतकऱ्यांना लुटणारी व्यवस्था तयार झाली साखर सम्राट,दूध सम्राट,अडत दुकानदार, दलाल, कृषी कंपन्या लुटतात मात्र आता तोडकरी मजूर सुद्धा लुटायला लागले आहेत तोडकरी मजुरांचे शेतकऱ्यांना लुटण्याचे धाडस होते आहे कारण शेतकरी संघटित नाही लूट होवू देण्यास शेतकरीही कारणीभूत आहे शेतकरी संघटित होत नाही जाब विचारण्याचे धाडस करत नाही साखर कारखानदार वजनात लुटतात त्या विरोधात बोलत नाही मजूर तोडीसाठी पैसे घेतात त्या विरोधात ब्र शब्द काढत नाही दूध सम्राट फॅट मध्ये चोरी करतात त्या विरोधात बोलायचे धाडस करत नाही अडत दुकानदारांकडून होणारी लूट मूकपणे पाहत बसतो द्राक्ष दलाल गंडा घालून जातात त्याचे नाव गाव विचारण्याची हिम्मत शेतकरी दाखवीत नाही द्राक्ष विक्री करताना मोठ्या प्रमाणात सुट धरली जाते त्याबाबतीत तक्रार करत नाही बेदाणा बॉक्स चे सर्व पैसे शेतकरीच सोसतो प्रत्येक बाबतीत शेतकरी मोठे मन दाखवतो त्यामुळे लुटणाऱ्या ची टोळी वाढत आहे ही लूट थमविण्यासाठी राजकारण बाजूला सारून आर्थिक प्रश्नावर संघटित झाले पाहिजे
साखर कारखानदारांनी वर्ष दोन वर्षे बिल दिले नाही तरीही शेतकरी चकार शब्द काढत नाहीत तासगाव नागेवाडी कारखान्याक्या थकीत ऊस बिलासाठी संघर्ष केला म्हणून 53 कोटीची ऊस बिले शेतकऱ्यांना मिळवून देण्यात आम्ही यशस्वी ठरलो आता केन ऍग्रो कारखान्याच्या थकीत बिले मिळविण्यासाठी संघर्ष सुरू करणार आहोत त्याचा पहिला टप्पा म्हणून एक ऑगस्ट रोजी पृथ्वीराज बाबा देशमुख यांच्या कडेपुर येथील बंगल्यावर मोर्चा काढणार आहोत या मोर्चाला सांगली , सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन खराडे यांनी केले आहे कार्यक्रमाला विजय पाटील, संभाजी पाटील,अशोक शिंदे, रमेश विभुते,अनिकेत शिंदे, नितीन पाटील,प्रताप शिंदे, संपतराव पाटील,राजाराम चव्हाण,राहुल पाटील,शरद गोडसे,शुभम पाटील,धोडिराम पाटील,सरदार सावंत,संदिप पाटील,श्रीमंत पाटील,सागर पाटील,वैभव पाटील,प्रमोद पाटील,संतोष पवार,कृष्णत पाटील,विजय रेंडलकर, बाळासो खरमाटे,अनिल वाघ, निशिकात पोतदार,अमित रावताळे,अनिल वाघ,दीपक पाटील ,उत्तम चंदनशिवे, नागेश पाटील, प्रशांत शिंदे,
संपतराव पाटील, सचिन वाघ, व हणमंत पाटील आदीसह घानवड पानमळेवाडी विसापूर हातनूर आळते आदीसह शेतकरी उपस्थित राहिले होते.
Published by …SK NEWS MARATHI
Advertise