जीवन विकास संस्थेचा आधारवड हरपला
तासगाव | प्रतिनिधी
तासगाव मधील जीवन विकास संस्थेचे अध्यक्ष, विठोबा देव नामदेव शिंपी समाज मंदिराचे विश्वस्त,न.प.शिक्षण मंडळाचे मा. सदस्य,साहित्यप्रेमी, कलाध्यापक,कविवर्य, कलासाधक मा.कृष्णनाथ यशवंत कोळेकर तथा के.वाय. कोळेकर यांचे वयाच्या 86 व्या वर्षी वृद्धापकाळाने काल रात्री 9.15 च्या सुमारास दुःखद निधन झाले.
अनेक संकटे व दुःखे त्यांनी हिमालयाप्रमाणे झेलली. वादळात सुद्धा बाभळीच्या झाडाप्रमाणे तग धरला. जीवन विकास संस्थेचा रोपट्याचा वटवृक्ष करण्यात व संस्था बांधणीत त्यांचा सिहांचा वाटा होता. तरूणाला लाजवेल अशी दुर्दम्य इच्छाशक्ती त्यांच्या जवळ होती. त्यांच्या जाण्याने पांढरीची विद्यापंढरी करणारा विठ्ठल निघून गेल्याची भावना व्यक्त केली जात आहे. एका वैचारिक, वैज्ञानिक ,अध्यात्मिक अशा त्रिवेणी संगम असलेल्या तेजस्वी सूर्याचा अस्त झाला. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली …! त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो. हीच ईश्वर चरणी प्रार्थना. रक्षा विसर्जन रविवार दिनांक 14 ऑगस्ट 2022 रोजी तासगाव स्मशानभूमी मध्ये सकाळी 9.00 वाजता होणार आहे.त्यांच्या पश्चात लेकी,सून,जावई,नातवंडे असा परिवार आहे.
सामान्यातील असामान्य व्यक्तिमत्त्व म्हणजे के.वाय. कोळेकर
♦️ जीवनप्रवास♦️
कृष्णनाथ यशवंत कोळेकर
कलासाधक
जन्म : 3 नोव्हेंबर 1936
पत्ता : सोमवार पेठ, शिंपी गल्ली,तासगाव
☘️भूषविलेला पदभार☘️
♦️ संस्थापक : कलासाधक, तासगाव.
♦️संस्थापक अध्यक्ष
जीवन विकास संस्था, तासगाव.
सह-सचिव
: अखिल भारतीय नामदेव समाजोन्नती परिषद.
♦️ ज्येष्ठ मार्गदर्शक
: नामदेव शिंपी समाज, तासगाव.
♦️ सदस्य
: नगर परिषद शिक्षण मंडळ,
तासगाव.
♦️ विश्वस्त
: श्री. केशवराज संस्था, नामदेव मंदिर, पंढरपूर.
♦️ सरचिटणीस
काँग्रेस आय कमेटी, तासगाव
♦️ अध्यक्ष
: विना अनुदानित महाविद्यालये संस्था चालक संघ, कोल्हापूर.
♦️ विद्यमान अध्यक्ष
: जीवन विकास संस्था,तासगाव
???? शैक्षणिक, सामाजिक व राजकीय प्रदीर्घ सेवा प्रवास ????
???? १९४५ – मातृवियोग
???? १९५५ – पितृवियोग
???? १९९८ – पुत्रवियोग
???? २०१७ – नातुवियोग
???? २०२२- पत्निवियोग
????१९५७ – एस.एस.सी
????१९५९ – डी.टी.सी
????१९६१ – हिंदी शिक्षक सनद
????१९५७ ते १९६० – राष्ट्रसेवा दलातील संस्काराने व्याख्याने, नाट्य, कलापथक, गणेशोत्सव, युवक मंडळे यात सहभाग व जेष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन.
????१९६० ते १९६२ – कलाध्यापक म्हणून शिक्षण सेवा प्रारंभ.स्वामी रामानंद भारती विद्यामंदिर तासगांव, अध्यापक ट्रेनिंग कॉलेज, तासगांव व जागृती अध्यापिका विद्यालय तासगांव येथे अध्यापनाचे कार्य.
????१९६३ – ‘नाटयझंकार’ या नाट्यसंस्थेची स्थापना.
????१९६४ – विवाहसंपन्न व जीवन विकास संस्थेची स्थापना.
????१९६३ ते १९६५ – पद्माराजे विद्यालय शिरोळ, म.गांधी विद्यालय सावळज येथे अध्यापनाचे कार्य.
????१९६४ – पं. जवाहरलाल नेहरू बालक मंदिराची स्थापना, तासगांव
???? १९६५ – ब्रम्हानंद विद्यालय ब्रम्हानंदनगर माध्य.शाळेची स्थापना.
????१९६६ – राजहंस उर्फ बालगंधर्व विद्यालय नागठाणे, माध्य. शाळेची स्थापना.
????१९६७ – विद्यानिकेतन, या शेतीशिवाय शेती शाळा, वेगळ्या तत्वावर चालणारी शेतकऱ्यांच्या शेती प्रत्याक्षिकावर चालणारी, नवी संकल्पना घेऊन यशस्वी ठरलेल्या माध्य. शाळेची स्थापना. वि. स. पागे, स्वामी रामानंद भारती, यांचे मार्गदर्शन व श्री.ज्ञा.ना.गोडबोले यांच्या सहकार्याने विद्यानिकेतनची यशस्वी वाटचाल.
????१९७४ – विज्ञान (कृषि) शाखेच्या ज्युनि. कॉलेजची सुरवात जिल्हयातील कृषि शिक्षणाचे महत्त्वाचे केंद्र.
???? १९७५ – विठ्ठलमंदिर-नामदेव शिंपी समाज ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून कार्याची सुरवात.
????१९७८ – तासगांव तालुका इंदिरा काँग्रेसच्या स्थापनेत सहभाग, तालुका चिटणीस म्हणून कार्य.
???? १९७९ – उत्क्रांती साहित्य समाज स्थापना, कोजागिरी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष.
???? १९८१ – तासगांव औद्योगिक वसाहत सह. संस्थेची स्थापना व कार्यारंभ दत्तमाळ तासगांव शासनाकडून विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून नियुक्ती.
????१९८३ – ‘नूतन मराठी विद्यानिकेतन’ व बालकमंदिर पूर्वप्राथमिक शाळेची स्थापना.
????१९९० – ‘विद्यानिकेतन’ च्या नव्या इमारतीस प्रारंभ.
????१९९१ – विद्यानिकेतन ज्युनि. कॉलेजमध्ये कला व वाणिज्य विभागाची सुरवात.
????१९९२ – विद्यानिकेतन ज्युनि. विभागात +२ स्तरावरील व्यावसायिक अभ्यासक्रमाची मंजुरी.
???? १९९४ – ‘विद्यानिकेन’ मध्ये कला-अध्यापक म्हणून १९६७ पासून केलेल्या सेवेतून ३० नोव्हेंबर ९४ पासून सेवानिवृत्त.
????२००१ – कला ,वाणिज्य व विज्ञान महिला महाविद्यालय, तासगाव स्थापना .
????२००८- सांगली येथे संपन्न झालेल्या ८१ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनासाठी ‘निमंत्रक’ म्हणून जीवन विकास संस्थेला मान मिळवून दिला..समर्थ पणे धुराही संभाळली.
????२०१० – विना अनुदानित महाविद्यालये संस्था चालक संघ, कोल्हापूर स्थापना व अध्यक्ष म्हणून कार्यभार स्वीकारला .
????२०१४ – जीवनज्योती माॅडर्न इंग्लीश मिडीअम स्कूल, तासगाव स्थापना .
????२०२१- जीवन विकास संस्थेला दिलेल्या योगदानाबद्दल त्यांच्या कार्यगैरवार्थ – संस्थेच्या बी सी ए विभागाला त्यांचे नामकरण…(गुरुवर्य श्री.कृष्णनाथ यशवंत कोळेकर बी.सी.ए.विभाग तासगाव)
Published by SK NEWS MARATHI