रथोत्सवासानिम्मित तासगावातील वाहतुकीत बदल | असा आहे वाहतूक मार्ग | Tasgaon

रथोत्सवासानिम्मित तासगावातील वाहतुकीत बदल

आठवडा बाजार रद्द
“””””””””””””””””””””””””””””””””””””
तासगाव प्रतिनिधी : किरण देवकुळे

आज गुरुवार १ सप्टेंबर रोजी तासगाव येथील रथोत्सव सालाबादप्रमाणे साजरा केला जाणार आहे. या रथोत्सवासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने भाविक येत असतात तर, हा रथोत्सव शहरातील मुख्य मार्गावर होत असल्याने या दिवशी रात्री १२ वाजेपर्यंत वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

वाहतुकीतील बदल पुढीलप्रमाणे ;- १) सांगली-मणेराजूरी कडून विटा-आटपाडी कडे जाणारी वाहने कॉलेज कॉर्नर- भिलवडी नाका- एस.टी.स्टँड- विटा नाका या मार्गे जातील. २) विटा भागातून सांगलीला जाणारी वाहने विटा नाका- चिंचणी नाका- चिंचणी चौक- थळेश्वर मंदिर- मणेराजूरी हायवे- कॉलेज कॉर्नर या मार्गाने जातील. ३) आटपाडीहून सांगलीला जाणारी वाहने पुणदी फाटा- वाघमोडे वस्ती, चिंचणी-चिंचणी चौक- थळेश्वर मंदिर- मणेराजूरी हायवे- कॉलेज कॉर्नर या मार्गाने जातील.

तर, पार्कींग व्यवस्था पुढीलप्रमाणे ;- १) विटा, आटपाडी, चिंचणी कडून येणारी दूचाकी व चारचाकी वाहने- कृषी उत्पन्न बाजार समिती आवार २) सांगली, मणेराजूरी, भिलवडी कडून येणारी चारचाकी वाहने- बुद्धीष्ठ सोसायटी, कॉलेज कॉर्नर जवळील मैदान, दत्त मंदिर समोरील मैदान ३) सांगली, मणेराजूरी कडून येणारी दूचाकी – क्रीडा संकुल मैदान अशी असेल.

रथोत्सवा दरम्यान वाहतुक नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी दिली आहे.

आठवडा बाजार रद्द

नागरिकांची व व्यापाऱ्यांची गैरसोय होवू नये यासाठी रथोत्सवादिवशी असणारा गुरुवार आठवडा बाजार रद्द करण्यात आला आहे.
— मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील

Published by SK NEWS MARATHI