ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी संबंधित शाखांमध्ये संपर्क साधण्याचे कारखान्याच्या वतीने कार्यकारी संचालक आर.डी.पाटील यांचे आवाहन | Tasgaon | Sangli

ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी संबंधित शाखांमध्ये संपर्क साधण्याचे कारखान्याच्या वतीने कार्यकारी संचालक आर.डी.पाटील यांचे आवाहन

➖➖➖➖➖➖➖
गळीत हंगाम २०२०-२१ मध्ये ज्या ऊस पुरवठादार शेतकऱ्यांची ऊस बिले थकीत होती अशा सर्व शेतकऱ्यांची मुळ रु २५०० प्रति मे टनाच्या १३.१०% प्रमाणे होणारी रक्कम रुपये ३२७.५० प्रती टन संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहे.
*एकुण २८७९ शेतकऱ्यांना मुळ ऊस बिलांच्या १३.१० % रक्कम रु २,२६,०७,६४९ (रु. दोन कोटी सव्वीस लाख सात हजार सहाशे एकोणपन्नास) व ऊस पुरवठा केलेल्या सर्व शेतकऱ्यांना ऊस बील देण्यास उशीर झाल्याने १५ % व्याजा प्रमाणे होणारी रक्कम रू. २,४५,००,२१२ ( दोन कोटी पंचेचाळीस लाख दोनशे बारा ) अशी एकूण रू. ४,७१,०७,८६२ ( चार कोटी एक्काहत्तर लाख सात हजार आठशे बासष्ट) दि. २५/११ रोजी तहसीलदार तासगांव यांच्याकडे जमा केली होती.*
यापूर्वी ८६.९० % प्रमाणे रक्कम जमा केली होती. तसेच ज्या शेतकऱ्यांना ऊस वेळेत देता आले नव्हते अशा सर्व शेतकऱ्यांना १५ % व्याज अदा केले आहे.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी संबंधित शाखांमध्ये संपर्क साधावा असे आवाहन कारखान्याच्या वतीने कार्यकारी संचालक आर.डी.पाटील यांनी केले आहे.
…………………..
(विशेष प्रतिनिधी )
Nov 27 2022
Published by
SK NEWS MARATHI
☘️☘️☘️☘️☘️
▪️आपले कुटुंब
*https://chat.whatsapp.com/EL7D4sVQhq6Da3UsmKsrQ7*