तासगांवच्या महावितरण कार्यालयात जागतिक ग्राहक दिन संपन्न | Tasgaon| Sangli

तासगांवच्या महावितरण कार्यालयात जागतिक ग्राहक दिन संपन्न

(तासगाव : प्रतिनिधी)
तासगांव – येथील महावितरणच्या उप विभागीय कार्यालयात जागतिक ग्राहक दिन संपन्न झाला. या कार्यक्रमाचे आयोजन तासगांव तहसिल कार्यालय आणि महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी चा तासगांव उप विभाग यांनी संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. त्याप्रसंगी बोलताना मा.निवासी नायब तहसिलदार नितीन धापसे पाटील म्हणाले की, ग्राहकांचे प्रबोधन करण्यासाठी ज्या संघटना अहोरात्र काम करतात, त्यांच्या पाठीशी समाजाने ठामपणे उभे राहिले पाहिजे. जागतिक ग्राहक दिनासारखे छोटे मोठे उपक्रम करून ग्राहकांचे सतत जागरण करत राहणे आवश्यक आहे.

सुरुवातीला महावितरणचे शाखा अभियंता मा.चैतन्य इनामदार यांनी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक केले. नंतर महावितरण तासगांव उप विभाग १ चे उप अभियंता मा.सिकंदर मुल्ला यांनी उपस्थित मान्यवरांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. मग ग्राहक पंचायत, महाराष्ट्रचे विभागीय संघटक मा.आलमशहा मोमीन यांनी जागतिक ग्राहक दिनाचा इतिहास आणि तो साजरा करण्यामागची भूमिका सांगितली. त्यानंतर जागृत ग्राहकराजा संघटना, महाराष्ट्रचे विभागीय संघटक मा.मिलींद सुतार यांनी नव्या ग्राहक संरक्षण कायद्याबद्दलची माहिती सांगितली आणि ग्राहक प्रबोधन करताना आलेले रंजक अनुभव सांगितले. मा.धनंजय मोहिते यांचेही भाषणं झाले. यावेळी महावितरण तासगांव उप विभाग १ चे उप अभियंता मा.सिकंदर मुल्ला म्हणाले की, महावितरणचा प्रतिनिधी म्हणून मी आश्वासन देतो की ग्राहक प्रबोधनासाठी अआमचे सगळे कर्मचारी सदैव प्रयत्न शील राहतील. मा.निवासी नायब तहसिलदार नितीन धापसे पाटील यांनी अध्यक्षीय भाषणं केले आणि कार्यक्रमाचा समारोप केला. यावेळी महावितरणच्या तासगांव उप विभाग २ चे उप अभियंता मा.भारत होनमाने आणि दोन्ही कार्यालयातील सर्व कर्मचारी आणि वीज ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार मा.चैतन्य इनामदार यांनी मानले तर सूत्रसंचालन मिलींद सुतार यांनी केले.

Published by SK NEWS मराठी