सांगलीच्या शिरपेचात मानाचा तुरा | प्रतीक्षा बागडी ठरली महाराष्ट्राची पहिली महिला महाराष्ट्र केसरी | Sangli
सांगली जिल्ह्यातील तुंग गावच्या पैलवान प्रतिक्षा बागडी ह्यांनी पहिल्यांदाच आयोजित केलेल्या म जीहिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत विजयी होऊन पहिली महिला महाराष्ट्र केसरी होण्याचा मान पटकवला त्याबद्दल हार्दिक अभिनंदन !
#महाराष्ट्र_केसरी #women #कुस्ती #PratikshaBegad
कल्याणच्या वैष्णवी पाटीलला नमवून जिंकली चांदीची गदा
सांगलीत आयोजित केलेल्या पहिल्या महिला महाराष्ट्र केसरीची सांगलीचीच प्रतीक्षा बागडी (Pratiksha Bagdi) मानकरी ठरली आहे. कल्याणच्या वैष्णवी पाटील (Vaishnavi Patil) या महिला मल्लाला तिने नमवले आहे. ७६ किलो वजनी गटात ही कुस्ती खेळली गेली.
राज्यभरातून विविध वजनी गटासाठी ४३ संघ आणि ३०० महिला मल्ल या स्पर्धेसाठी सहभागी झाले होते. चांदीची गदा आणि ५१ हजार रुपयांचे बक्षीस देऊन प्रतीक्षा चा सन्मान करण्यात आला आहे .तर २५ हजार रुपयांचे बक्षीस वैष्णवी पाटील हिला देण्यात आले आहे. कुस्तीगीर परिषदेचे कार्याध्यक्ष नामदेवराव मोहिते, माजी महापौर संगीता खोत,जयश्री पाटील यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
Published by SK NEWS मराठी