सांगली शिक्षण संस्था शैक्षणिक संकुलात महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा |Tasgaon

सांगली शिक्षण संस्था शैक्षणिक संकुलात महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा

विशेष प्रतिनिधी | तासगाव

आज १ मे हा दिवस राज्यात महाराष्ट्र दिन व कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून तासगाव शैक्षणिक संकुलातील राधा- गोविंद मराठे बालशाळा, चंपाबेन वाडीलाल ज्ञानमंदिर व पटवर्धन कन्या शाळा या तीन ही शाळांच्या संयुक्त विद्यमाने ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी कामगारांचे प्रतिनिधित्व करणारे अक्षय गायकवाड (डिप्लोमा मॅकेनिकल) हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. ध्वजारोहणानंतर महाराष्ट्र गीताचे गायन झाले.

कार्यक्रमाचे स्वागत- प्रास्ताविक व महाराष्ट्र दिन व कामगार दिनाची माहिती रा.गो.मराठे बालशाळेचे मुख्याध्यापक सुभाष बल्लाळ यांनी दिली. तर, कार्यक्रम प्रसंगी उपस्थित मान्यवरांचे आभार बालशाळेचे पर्यवेक्षक वसंत सकटे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे निवेदन ला.ज माळी यांनी केले. याप्रसंगी तीन ही शाळांचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, अधीक्षक, शिक्षक वृंद, कर्मचारी वृंद, विद्यार्थी व पालक बहुसंख्य संख्येने उपस्थित होते.

विशेष प्रतिनिधी/किरण देवकुळे

Published by SK NEWS मराठी