खानापूर येथे आयोजित रक्तदान शिबिरात 160 निरंकारी भक्ताचा उस्फूर्त सहभाग | Sangli

खानापूर येथे आयोजित रक्तदान शिबिरात 160 निरंकारी भक्ताचा उस्फूर्त सहभाग

(प्रतिनिधी | शुभम पाटील)

संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा असलेल्या संत निरंकारी चॅरिटेबल फौडेंशनच्या वतीने सत्संग भवन खानापुर येथे आयोजित विशाल रक्तदान शिबिरात 160 भाविकांनी उस्फूर्त सहभाग घेतला.
शिबिराचे उद्घाटन जलसंपदा विभागाचे उपअभियंता अधिकारी श्री किरण जाधव व खानापुर सेक्टरचे संयोजक श्री दत्तात्रय जगताप यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले यावेळी किरण जाधव म्हणाले की संत निरंकारी मंडळ ही एक अशी संस्था आहे की आध्यात्मिक जागृती बरोबर सामाजिक कार्यात अग्रेसर आहे सदगुरुच्या शिकवणीनुसार निरंकारी भक्त निस्वार्थ भावनेने सेवा करतात त्यांनी रक्तदानाचे फायदे आणी महत्त्व याविषयी समजाऊन सांगितले.दत्तात्रय जगताप म्हणाले की रक्तातील सर्व घटक वेगवेगळे करता येतात पण सर्व घटक एकत्र करून रक्त तयार करता येत नाही रक्तदान केले मुळे एखाद्याचा जिव वाचु शकतो म्हणुनच म्हटले आहे की रक्तदान जिवन दान रक्तदान सारखे श्रेष्ठ असे दुसरे कोणते दान नाही”मानव को मानव हो प्यारा एक दुजे का बने सहारा” या निरंकारी बाबाजीच्या शिकवणीनुसार आज समस्त निरंकारी जगतामध्ये संत महापुरुष “मानव सेवा हिच ईश्वराची सेवा” मानुन सामाजिक सेवा करित असतात मानवातील माणुसकी गेली तर मानवामध्ये असलेले माणुसकीचे गुण लुप्त पावतात आपुलकीची भावना नष्ट पावते मानवच मानवाचा शत्रु बनतो म्हणुन समयाच्या सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज एका देवाची ओळख करून देऊन मानवातील माणुसकी जागृत करण्याचे महान कार्य करीत आहेत.डॉ जगदीश कुमार यांनी रक्तदान करणे का गरजेचे आहे याची सविस्तर माहिती दिली व मंडळाच्या कार्याचे कौतुक केले.


रक्तसंकलन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज व पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय वैद्यकीय रुग्णालय सांगली यांनी केले.
शिबिराचे नियोजन खानापुर सेक्टर संयोजक दत्तात्रय जगताप यांचे मार्गदर्शन खाली सेवादल शिक्षक पोलीस उपनिरीक्षक (पी एस आय) श्री सागर जाधव व सेवादल युनिट नं. 824 चे सर्व सेवादल बंधु भगिनी यांनी केले.

Published by SK NEWS MARATHI