स्वाभिमानी मराठा महासंघाचे अनंत पोळ यांनी जपली मानवता | रुग्णाच्या नातेवाईकांकडून आभार व्यक्त | खासदार श्रीनिवास पाटील यांनी दिले मतदीचे आश्वासन

स्वाभिमानी मराठा महासंघाचे अनंत पोळ यांनी जपली मानवता

रुग्णाच्या नातेवाईकांकडून आभार व्यक्त

खासदार श्रीनिवास पाटील यांनी दिले मतदीचे आश्वासन

तासगाव : (प्रतिनिधी शुभम पाटील,येळावी)

तासगांव तालुक्यातील येळावी येथील स्वाभिमानी मराठा महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र चे प्रमुख अनंत पोळ यांनी फेसबुक वरची पोस्ट वाचली असता त्यांना लक्षात आले की प्रतिक्षा माळी (राहणार शेणोली, तालुका कराड) कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाला (Bsc) कराड या ठिकाणी शिक्षण घेत आहे. एप्रिल महिन्यात अचानक तिच्या पोटात दुखायला लागले व दिसायला कमी झाले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर समजले की तिच्या दोन्ही किडन्या खराब झाल्या आहेत. लवकर उपचार झाला नाहीतर तिचा जीव वाचणे अवघड आहे. वडील मुलीसाठी आपली एक किडनी देण्यासाठी तयार झाले.

गेल्या आठवड्यात पुण्यातील बिर्ला हॉस्पिटलमध्ये किडनी ट्रान्सप्लांट चे ऑपरेशन झाले आहे. दोघेही हॉस्पिटलमध्ये अडमिट आहेत. दोघांची तब्येत चांगली आहे. ऑपरेशन (७ लाख ८० हजार) व इतर एकूण खर्च १२ ते १३ लाख रुपये आहे.


मुलीचे वडील शेतकरी व सामान्य कुटुंबातील आहेत. ‘शेणोली’ या ठिकाणी मोटर पंप दुरुस्ती ची छोटी मोठी कामे करतात.
या शेतकरी कुटुंबाला पैसा ची गरज आहे.अशी पोस्ट बघताच त्यांनी सबंधित नातेवाईकांशी संपर्क करून आदरणीय मुख्यमंत्री साहेब व उपुख्यमंत्री साहेब यांचा नंबर देऊन संपर्क करायला सांगितला.पुढे त्यांनी सातारा चे खासदार श्रीनिवास पाटील यांना कॉल करून सर्व माहिती सांगितली असता त्यांनी संबधित रुग्णाची माहिती घेऊन सर्व प्रकारची मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.त्यांनी केलेल्या मदती मुळे एका कुटुंबावर आलेल्या संकटातून सावरण्यासाठी खूप मदत झाली आहे.श्रद्धा कणसे यांनी अनंत पोळ आणि श्रीनिवास पाटील साहेब यांचे आभार मानले.

Published by SK NEWS MARATHI TASGAON