15 ऑगस्ट संत निरंकारी मिशनने आत्मिक स्वातंत्र्याचे पर्व रुपात साजरे केले मुक्ती पर्व
दिल्ली, 15 ऑगस्ट, 2023 (प्रतिनिधी : शुभम पाटील ) संपूर्ण भारतवर्षात 15 ऑगस्ट रोजी 77 वा स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात आला. याच दिवशी प्रतिवर्षाप्रमाणे निरंकारी जगतात हा दिवस आत्मिक स्वातंत्र्याचे पर्व म्हणून साजरा केला गेला ज्याला ‘मुक्ती पर्व’ असे संबोधित करण्यात आले आहे. यानिमित्ताने देशभरातील सर्व शाखांमध्ये विशेष सत्संग समारोहांचे आयोजन करण्यात आले.
… कोल्हापूर झोन नं. 32 खानापूर सेक्टर
ब्रॅच खानापूर येथे श्री अप्पासाहेब गुरव जी ( प्रचारक गारगोटी ) यांच्या प्रमुख उपस्थितीत… ‘मुक्ती पर्व’ दिवस समारोह आयोजित करण्यात आला. त्यामध्ये परिसरातील निरंकारी भाविक भक्तगणांनी मोठ्या संख्येने भाग घेतला आणि मानवतेच्या कल्याणासाठी आपले जीवन समर्पित केले अशा मुक्तीचा मार्ग प्रशस्त करणाऱ्या दिव्य विभुतींच्या प्रति आपली भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
विशेष करुन मुक्ति पर्व प्रसंगी शहनशाह बाबा अवतारसिंहजी, जगतमाता बुद्धवंतीजी, निरंकारी राजमाता कुलवंत कौरजी, सद्गुरु माता सविंदर हरदेव जी, संतोखसिंहजी तसेच इतर अनेक भक्तांनी मानवाला सत्यज्ञानाच्या दिव्य ज्योतीशी अवगत करण्यासाठी आपले जीवन वेचले. त्यांना हृदयापासून श्रद्धा सुमने अर्पित करण्यात आली. यावेळी त्यांच्या प्रेरणादायक जीवनातून शिकवण प्राप्त करण्यात आली. या सर्व संतांनी अनेक प्रकारच्या विषम परिस्थितिचा मुकाबला करत आपल्या तपत्यागाने युक्त जीवनाद्वारे मिशनला नवनव्या उंचीवर घेऊन जाण्याचे कार्य केले. त्याच्या या कार्याबद्दल निरंकारी जगतातील प्रत्येक भक्त आयुष्यभर त्यांचा ऋणी राहील.
मिशनची हीच धारणा आहे, की ज्याप्रमाणे आपल्या भौतिक विकासासाठी कोणत्याही अन्य देशाच्या पारतंत्र्यातून मुक्त होणे आवश्यक आहे तद्वत आपल्या अंतरात्म्यालाही बंधनातुन मुक्ती प्रदान करण्याची नितांत आवश्यकता आहे आणि हे कार्य ब्रह्मज्ञानाच्या दिव्य ज्योतीद्वारेच शक्य आहे. कारण हीच दिव्य ज्योत आम्हाला निराकार प्रभु-परमात्म्याचे दर्शन घडवते.
मुक्तिपर्व समागमाची सुरवात 15 ऑगस्ट, 1964 पासून शहनशाह बाबा अवतारसिंहजी यांच्या जीवनसंगिनी जगतमाता बुद्धवंतीजी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ त्या सेवेचे मूर्तिमंत उदाहरण होत्या. त्यांनी आपले संपूर्ण जीवन मिशनची व भक्तगणांनी नि:स्वार्थपणे सेवा करण्यामध्ये अर्पण केले. त्याच्यानंतर जेव्हा शहनशाह बाबा अवतारसिंहजी सन् 1969 मध्ये ब्रह्मलीन झाले तेव्हा या दिवसाला ‘जगतमाता-शहनशाह दिवस’ असे संबोधित करण्यात आले. त्यानंतर सन् 1979 मध्ये जेव्हा संत निरंकारी मंडळाचे प्रथम प्रधान लाभसिंहजी यांनी आपल्या नश्वर देहाचा त्याग केला तेव्हापासून बाबा गुरबचनसिंहजी यांनी या दिवसाला ‘मुक्ति पर्व’ हे नाव दिले.
दरम्यान 29 ऑगस्ट, 2014 रोजी ममतामयी निरंकारी राजमाताजी यांनी आपल्या नश्वर देहाचा त्याग करुन निराकारात विलीन झाल्या तेव्हापासून त्यांचेही नाव या पर्वाशी जोडले गेले. पुढे पूज्य माता सविंदर हरदेवजी यांनी 5 ऑगस्ट, 2018 रोजी आपल्या नश्वर शरीराचा त्याग केला. त्यांनी 2016 पासून मिशनची धुरा सांभाळली तत्पूर्वी 36 वर्षे त्यांनी बाबा हरदेवसिंहजी यांच्या समवेत मिशनच्या कार्यामध्ये प्रत्येक क्षेत्रात आपला सहयोग दिला आणि निरंकारी जगतातील प्रत्येक भक्ताला आपल्या वात्सल्याने कृतार्थ केले. त्यांची अनुपम छबी निरंकारी जगतात प्रत्येक भक्ताच्या हृदयामध्ये सदैव कायम राहील. मुक्ती पर्व दिनी सद्गुरुंच्या आदेशानुसार समस्त भक्तांकडून माता सविंदर हरदेवजी यांच्या प्रति श्रद्धा सुमने अर्पित केली जातात.
नि:संदेह हे महान पर्व निरंकारी जगतातील त्या सर्व संतांना समर्पित आहे ज्यांनी प्रेम, परोपकार, बंधुत्वाच्या भावनेने युक्त असे आपले जीवन जगून सर्वांसमोर एक सुंदर उदाहरण प्रस्तुत केले.
Published by SK NEWS MARATHI