‘भूमिअभिलेखा’तील अधिकाऱ्याच्या नव्हे तर, भ्रष्टाचाराच्या कानशिलात लगावली..!
सर्वसामान्य नागरिकांतून प्रदीप मानेंचे कौतुक
तासगाव | विशेष प्रतिनिधी : किरण देवकुळे
शुक्रवारी दूपारी तासगाव येथील भूमिअभिलेख कार्यालयातील संतापजनक प्रकार पाहून संतापलेले शिवसेना (ठाकरे गट) तालुका प्रमुख प्रदीपकाका माने यांनी एक अधिकारी, एक कर्मचारी व एका उमेदवाराच्या कानशिलात लगावली. यावरुन शहरासह तालुक्यात प्रदीप माने यांचे कौतुक होत आहे. प्रदीपकाका यांनी ‘भूमिअभिलेखातील अधिकाऱ्याच्या नव्हे तर, तेथील भ्रष्टाचाराच्या कानशिलात लगावली’ अशी प्रतिक्रिया सर्वसामान्यांतून व्यक्त होत आहेत.
तासगाव येथील महसूल विभागातील ‘भूमिअभिलेखात’ मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचारास खतपाणी मिळत असल्याच्या तक्रारी, येथे सर्वसामान्य नागरिकांची होणाऱ्या पिळवणूकीबद्दल स्थानिक नागरिकांनी शिवसेना (ठाकरे गट) तालुकाप्रमुख प्रदीप माने यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. याची दखल घेऊन प्रदीप माने यांनी अनेकदा येथील अधिकाऱ्यांना समज दिली होती, कारभार सुधारा अन्यथा शिवसेना स्टाईलने भ्रष्टाचाराचा भांडाफोड करु असा इशारा दिला होता. मात्र, ‘हम करे सो कायदा’ या अविर्भावातील अधिकाऱ्यांनी कोणताही बदल न करता सर्वसामान्यांची पिळवणूक सुरु ठेवली होती.
अखेर तो दिवस उजाडला आणि शुक्रवारी दूपारी तालुक्यातील एका नागरिकाची व्यथा ऐकण्यासाठी भूमिअभिलेख कार्यालयात तालुकाप्रमुख प्रदीप माने यांनी पाऊल टाकला मात्र, त्याठिकाणी एक खासगी व्यक्ती सरकारी कागदपत्रे हताळत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला या संतापजनक प्रकारातून संतापलेल्या प्रदीप माने यांनी त्या प्रकाराबद्दल तेथील अधिकाऱ्यांकडे चौकशी करत असताना मस्तीची भाषा वापरणाऱ्या अधिकारी, कर्मचारी व त्या खासगी व्यक्तीच्या कानशिलात लगावली. या प्रकाराचा व्हिडीओ सोशलमिडीयावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. यावरुन शहरासह तालुक्यात प्रदीप माने यांचे कौतुक होत आहे. प्रदीपकाका यांनी ‘भूमिअभिलेखातील अधिकाऱ्याच्या नव्हे तर, तेथील भ्रष्टाचाराच्या कानशिलात लगावली’ अशी प्रतिक्रिया सर्वसामान्यांतून व्यक्त होत आहेत.
Published by SK NEWS MARATHI