संत निरंकारी मिशन तर्फे नरवाड येथे आयोजित विशाल रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद
प्रतिनिधी : शुभम पाटील
संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फौडेंशनच्या वतीने नरवाड येथे रविवारी आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्यामध्ये 80 रक्तदात्यांनी रक्तदान केले मिरज व नरवाड शाखेच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
शिबिराचे उद्घाटन नरवाड गावचे प्रथम नागरिक मारुती जमादार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले मिरज व नरवाड या दोन्ही शाखेमधील निरंकारी भक्तांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली रक्त संकलन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज रक्तपेढीचे प्रमुख डॉ. जगदीश कुमार यांनी आपल्या टीम द्वारे केले.
त्यांनी आपल्या विचारातून उद्गगार काढले की ज्या ज्या वेळी रक्ताची कमतरता भासेल त्या त्या वेळी संत निरंकारी मंडळ योगदान देते तसेच त्यांनी रक्तदान विषयी फायदे सांगितले.
संत निरंकारी मंडळ मिरज शाखा मुखी प्रा.सुनील पाटील व नरवाड शाखाप्रमुख बाबासाहेब कुर्ले यांच्या देखरखीखाली सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिर यशस्वी करण्यासाठी निरंकारी सेवादल युनिट नं.1510 यांनी विशेष परिश्रम घेतले.
Published by SK NEWS MARATHI