तरुणांनी नोकऱ्यांच्या मागे न लागता, उद्योजकच बनावे : मिलींद सुतार |Tasgaon | Sangli

तरुणांनी नोकऱ्यांच्या मागे न लागता, उद्योजकच बनावे : मिलींद सुतार

तासगांव – प्रतिनिधी

येथील शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन येथील वीरांगना सभागृहात झालेल्या कार्यक्रमात मा.मिलींद सुतार यांनी हे उद्गार काढले.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद प्रायोजित स्वावलंबी भारत अभियाना अंतर्गत उद्योजकता विकास यात्रा काल तासगांवात आली होती. यात्रेचे स्वागत व प्रास्ताविक महिला तंत्रनिकेतनच्या प्रशिक्षण प्रकल्प अधिकारी मा. अनिता क्षिरसागर यांनी केले. स्वावलंबी भारत अभियानाचे पूर्णवेळ कार्यकर्ते राजाभाऊ शिंदे यांनी राष्ट्रीय पातळीवर सुरु असलेल्या अभियानाची माहिती विषद केली. त्यानंतर बोलताना कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आणि जागृत ग्राहक संघटनेचे विभागीय संघटक मा.मिलींद सुतार म्हणाले की महाविद्यालयीन विद्यार्थ्यां मध्ये नोकऱ्यांचे अनावश्यक आकर्षण आहे. मात्र नोकऱ्या उपलब्ध नाहीत. त्यामुळे तरुणांनी नोकऱ्यांच्या मागे न धावता उद्योजकच बनावे. तसेच आपण निवडलेल्या क्षेत्राशी प्रामाणिक राहून त्याच क्षेत्रात नवनवीन संधी शोधाव्यात. त्यानंतर पलूस येथील यशस्वी उद्योजक मा.सुनिल पवार यांचेही भाषण झाले. या कार्यक्रमाचा समारोप महिला तंत्रनिकेतनचे प्रभारी प्राचार्य मा.पाटील यांनी केला. आभार मा.जोशी मॅडम यांनी मानले. यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे जिल्हा संघटन मंत्री गणेश हलवर, तासगांव तालुका संयोजक केतन शेंडगे तसेच तंत्रनिकेतनमधील सर्व प्राध्यापक आणि सर्व शाखेच्या विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

…………………….

Published by SK NEWS MARATHI