तासगावातील पत्रकारांचा चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दौऱ्यावर बहिष्कार | Sangli

तासगावातील पत्रकारांचा चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दौऱ्यावर बहिष्कार

पत्रकारांना ढाब्यावर न्या, त्यांना चहा – पान करा, असे वक्तव्य करणाऱ्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा तासगावातील पत्रकारांनी निषेध केला. बावनकुळे यांच्या आजच्या तासगाव दौऱ्यावर तासगावातील सर्व पत्रकारांनी बहिष्कार टाकला.

येथील पंचायत समिती येथे सर्व पत्रकारांची बैठक झाली. बैठकीत पत्रकारांनी बावनकुळे यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध केला. महाराष्ट्रातील पत्रकार स्वाभिमानी आहेत. पत्रकार चहा – पानावर अवलंबून नाहीत. बावनकुळे यांनी केलेले वक्तव्य संतापजनक आहे. सर्व स्वाभिमानी पत्रकारांचा अपमान करणारे आहे, अशा भावना पत्रकारांनी व्यक्त केल्या.

राज्यभरातून बावनकुळे यांच्या वक्त्यव्याचा पत्रकारांकडून निषेध होत असतानाच आता तासगाव येथील पत्रकारांनीही निषेध केला आहे. बावनकुळे यांच्या आजच्या तासगाव दौऱ्यावर पत्रकारांनी बहिष्कार टाकला. त्यांच्या कार्यक्रमाकडे एकही पत्रकार फिरकले नाहीत. यावेळी तासगाव तालुक्यातील सर्व प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार उपस्थित होते.

Published by SK NEWS MARATHI