तासगांव नगर परिषदेत माहिती अधिकार दिन संपन्न
तासगांव येथील नगर परिषदेच्या कै.मा.आर.आर.पाटील सभागृहात माहिती अधिकार दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला. आस्थापना प्रमुख मा.प्रियांका भोसले यांनी प्रास्ताविक केले. वरिष्ठ लिपिक मा.राजेंद्र माळी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व जागृत ग्राहकराजा संघटनेचे कोल्हापूर विभागीय संघटक मा.मिलींद सुतार यांनी बोलताना सांगितले की माहिती अधिकार कायदा हा पारदर्शक पद्धतीने प्रशासकीय कामकाज व्हावे या उद्देशाने तयार केलेला कायदा आहे. या कायद्याच्या अंमल बजावणीमध्ये कामकाजातील बेशिस्तपणा हा सगळ्यात महत्वाचा अडथळा आहे. तुम्ही दैनंदिन काम काजामध्ये तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवून काम करावे. म्हणजे तुमच्या समोर येणारा कोणीही नाराज होवून किंवा चिडून जावून तुम्हाला त्रास देण्याच्या उद्देशाने माहिती अधिकार कायद्याचा वापर करणार नाही. तसेच दप्तर दिरंगाई न करता पारदर्शक कामकाज केल्यास माहिती अधिकार कायदा वापरण्याचे प्रमाण कमी होईल.
मा. मिलींद सुतार यांनी कर्मचाऱ्यांची छोटीशी कार्यशाळाच घेतली. यावेळी माहिती अधिकार कायद्याच्या छोट्या पुस्तकांचे वितरणही करण्यात आले. प्रकल्प अधिकारी मा.परशुराम गायकवाड यांनी आभार प्रदर्शन केले. याप्रसंगी झालेल्या चर्चेत कार्यालय अधिक्षक मा. धनश्री पाटील, कर निरीक्षक डॉ. चेतना साळुंखे, वरिष्ठ लिपिक मा. कैलास खटावकर, घरकुल योजनेचे अभियंता मा.अश्विन कोकणे, लिपिक मा. प्रविण धाबुगडे या कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमास नगर परिषदेतील सर्व कर्मचारी व नागरिक सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Published by SK NEWS MARATHI