कुंडल राष्ट्रवादीकडे,आमणापुर भाजपकडे तर संतगांव विठ्ठलवाडीवर कॉंग्रेसची सत्ता
(पलुस प्रतिनिधी :प्रतिक पाटील) पलूस तालुक्यात काँग्रेसला दोन ,भाजपाकडे एक तर राष्ट्रवादीकडे एक ग्रामपंचायत सत्ता आली आहे. माजी मंत्री डॉ. विश्वजित कदम यांना धक्का देत विधान परिषदेचे आमदार अरुण लाड यांनी कुंडल ग्रामपंचायतवर सत्ता काबीज केली आहे.कुंडलमध्ये १७ पैकी १४ जागासह सरपंच पदाचे उमेदवार विजय मिळावीत राष्ट्रवादीने सत्ता काबीज केली. पदवीधर विधान परिषदेचे आमदार अरुण लाड यांनी आपली सत्ता कायम ठेवण्यात यशस्वी झाले आहे.
तालुक्यातील आमणापूर ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेसच्या सत्तेला सुरुंग लावत सरपंच उमेदवारासहित भाजपा – राष्ट्रवादी – काँग्रेस युतीची सत्ता आली. १३ पैकी ९ जागा भाजपा युतीने जिंकल्या. तर काँग्रेसला फक्त ४ जागेवर समाधान मानावे लागले. तर तर विठ्ठलवाडी ग्रामपंचायत मध्ये काँग्रेसला तीन जागा व भाजपा प्रणित आघाडीला चार जागा मिळाल्या. या ठिकाणी निवडणुकी अगोदर, काग्रेसचा एक सदस्य, आणि सरपंच यांची बिनविरोध निवड झाली होती. राडेवाडी ग्रामपंचायतसाठी काँग्रेस सरपंच पदाचा उमेदवार विजय झाला आहे. येथे काँग्रेसला तीन आणि सरपंच पद व राष्ट्रवादी काँग्रेसला चार जागा मिळाल्या आहेत.राडेवाडी येथे कांग्रेसच्या सुखदा अरूण सावंत, आमणापूर येथे भाजपच्या बालिका आकाराम पाटील, विठ्ठलवाडी येथे कांग्रेसच्या दिपाली विनायक कोळी, कुंडल येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जयराज जगन्नाथ होवाळ हे विजयी झाले.
Published by SK NEWS MARATHI