कर्नाटकात ‘सरल वास्तु’ फेम चंद्रशेखर गुरुजींची हत्या, थरारक घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
मारेकर्यांपर्यंत पोहोचण्यासाठी पोलीस श्वानांचीही मदत घेत आहेत. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी KIMS रुग्णालयात पाठवला आहे. तसेच गुरुजींच्या कुटुंबीयांनाही घटनेची माहिती देण्यात आली आहे
‘सरल वास्तू’ने स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या चंद्रशेखर गुरुजींची चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना मंगळवारी हुबळी येथील एका हॉटेलमध्ये घडली आहे. या घटनेने कर्नाटकमध्ये खळबळ उडाली आहे. हत्येची थरारक घटना हॉटेलमधील रिसेप्शनजवळील सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाली आहे. आरोपींनी गुरुजींवर चार वेळा वार केल्याचे सीसीटीव्हीत दिसत आहे. गुरुजी कुणाला तरी हॉटेलमध्ये भेटायला आले असता ही घटना घडली असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. हत्येनंतर मारेकरी फरार झाले आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुजी वैयक्तिक कामानिमित्त हुबळी येथे आले होते. या हत्येनंतर हॉटेलमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
वास्तु विशारद चंद्रशेखर गुरुजींनी कंत्राटदार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर ते मुंबईत नोकरीला लागले. पुढे चंद्रशेखर यांनी वास्तूचे काम सुरू केले. आज हुबळी काही कामानिमित्त ते आले होते. यावेळी हुबळी येथील एका हॉटेलमध्ये दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास ते बसले होते. याच दरम्यान अनुयायी म्हणून असलेल्या दोन व्यक्तींनी गुरुजींवर हल्ला केला. हल्ल्यानंतर दोघेही तेथून पळून गेले. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
⭕आरोपींच्या शोधासाठी श्वान पथकाची मदत घेताहेत
मारेकर्यांपर्यंत पोहोचण्यासाठी पोलीस श्वानांचीही मदत घेत आहेत. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी KIMS रुग्णालयात पाठवला आहे. तसेच गुरुजींच्या कुटुंबीयांनाही घटनेची माहिती देण्यात आली आहे. यापूर्वी चंद्रशेखर गुरुजींच्या कर्मचाऱ्यांनी अनेक महिन्यांपासून वेतन दिले नसल्याचा आरोप करत कामबंद आंदोलन केले होते. पोलीस या हत्येचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत. तपासाअंतीच हत्येमागचे खरे कारण कळेल. पोलीस तपासात सीसीटीव्ही फुटेजची मदत घेत आहेत.
Published by SK NEWS MARATHI